साऊथ इंडस्ट्रीतील ‘या’ अभिनेत्यामूळे ५० वर्षांची तब्बू आजही आहे अविवाहीत

बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या विवाहीत पुरुषाच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यांचे एक नाही तर अनेक रिलेशनशिप बनले. पण त्यांना लग्नाचे सुख मात्र मिळाले नाही. वयाची ५० ओलांडली तरी अभिनेत्री अविवाहीत आहेत जाणून घेऊया अशाच काही अभिनेत्रींबद्दल.

१ नगमा – बॉलीवूडमध्ये सलमान खानसोबत लॉन्च होणारी नगमा आजही अविवाहीत आहे. नगमा प्रेमात पडला. पण लग्नाचा आनंद मात्र त्यांना घेता आला नाही. सर्वात पहीले त्यांचे नाव क्रिकेटर सौरभ गांगूलीसोबत जोडले गेले. दोघांच्या अफेअरच्या बातम्यांनी बाजार गरम झाले होते. पण ते नाते पुढे गेले नाही.

सौरभ गांगूलीनंतर नगमाचे नाव विवाहीत रवी किशनसोबत जोडले गेले. अनेक वर्ष दोघांच्या अफेअरच्या चर्चा झाल्या. पण या नात्यात देखील नगमाला यश मिळाले नाही. नगमा आजही अविवाहीत आहे. सध्या ती अभिनयापासून दुर राजकारणात सक्रिय आहे.

२ आशा पारेख – ६० आणि ७० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री आशा पारेख देखील अजीवन अविवाहीत आहेत. आशा पारेख प्रेमात तर पडल्या. पण त्यांनी लग्न केले नाही. आशा पारेख निर्माते नासिर हुसैनच्या प्रेमात पागल झाल्या होत्या. पण त्यांचे लग्न होऊ शकले नाही. त्यांनी या गोष्टीबद्दल त्यांच्या पुस्तकात देखील सांगितले आहे. त्याच्यामूळे त्या आजही अविवाहीत आहेत.

३ परवीन बाबी – इंडस्ट्रीतील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून परवीन बाबीला ओळखले जाते. अनेकांच्या मनावर राज्य करणाऱ्या परवीन अनेकदा प्रेमात पडल्या. पण त्या प्रत्येक वेळी विवाहीत पुरुषाच्या प्रेमात पडले. त्यामूळे शेवटच्या क्षणापर्यंत त्या एकट्या राहिल्या. त्यांनी कधीच लग्न केले नाही.

४ तब्बू – ९० चे दशक गाजवणारी तब्बू ५० वर्षांची झाली आहे. पण आजही ती अविवाहीत आहे. तिने लग्न केले नाही. असे बोलले जाते की, साऊथ अभिनेता नागार्जूनमूळे तब्बू आजही अविवाहीत आहे. दोघांच्या रिलेशनशिपने इंडस्ट्रीला धक्का बसला होता. पण हे नात लग्नापर्यंत गेले नाही. कारण नागार्जून अगोदरच विवाहीत होते. नागार्जूनमूळे तब्बूने आजपर्यंत लग्न केले नाही.

५ सुष्मिता सेन – अभिनेत्री सुष्मिता सेनने तिच्या सौंदर्याने लाखो लोकांना दिवाने केले आहे. इंडस्ट्रीमध्ये सुष्मिताचे नाव अनेकांशी जोडले गेले. पण आजही ती अविवाहीत आहे. अनेक अभिनेते आणि दिग्दर्शकांसोबत तिचे रिलेशनशिप होते. पण कोणतेही नाते लग्नापर्यंत गेले नाही. अविवाहीत सुष्मिता एकटीच तिच्या दोन्ही मुलींचा सांभाळ करत आहे.

महत्वाच्या बातम्या –

हेमामालिनीसोबत किसिंग सीन करणार होते फिरोज खान; पण ‘या’ व्यक्तीने केला कडाडून विरोध
‘लव्ह स्टोरी’ फेम अभिनेत्री विजेता पंडितची झाली आहे खुपच वाईट अवस्था; आर्थिक अडचणींचा करत आहे सामना
नेहाने धुपीयाने मुलीला स्तनपान करतानाचा ‘तो’ फोटो केला शेअर अन् ट्रोलर्सची चांगलीच जिरवली
असा मराठमोळा क्रिकेटर होणे नाही, जाणून घ्या विजय हजारेंबद्दल काही रोमांचक गोष्टी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.