साधेपणामूळे प्रसिद्ध आहे साऊथची ‘ही’ सुंदर अभिनेत्री; बोल्ड सीन्सला देते नकार

फिल्म इंडस्ट्रीमध्ये टिकून राहण्यासाठी कलाकारांना अनेक गोष्टी कराव्या लागतात. त्यांनी काही केले नाही तर मग त्यांचे करिअर खराब होऊ शकते. अनेक वेळा अभिनेत्रींना त्यांचे करिअर टिकवण्यासाठी चित्रपटामध्ये बोल्ड सीन्स द्यावे लागतात.

अभिनेत्रींनी चित्रपटामध्ये बोल्ड सीन्स दिले तर मग त्यांच्या करिअरमध्ये फरक पडतो. असे मानले जाते. बोल्ड सीन्स आणि अंगप्रदर्शनामुळे अभिनेत्रींना चांगले काम मिळत जाते. असे बोलले जाते. म्हणून अनेक अभिनेत्री चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स देतात.

पण साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक अभिनेत्री अशी आहे जी कधीच चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स देत नाही किंवा अंगप्रदर्शन करत नाही. तरीही ती अभिनेत्री आज साऊथची टॉपची अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे किर्ती सुरेश.

किर्ती सुरेश हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधले खुप मोठे नाव आहे. फक्त साऊथ नाही तर सगळ्या भारतामध्ये किर्ती सुरेशचे करोडो चाहते आहेत. पण आजपर्यंत किर्तीने कधीही चित्रपटामध्ये बोल्ड सीन्स दिले नाहीत किंवा अंगप्रदर्शन केले नाही.

किर्तीने तिच्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर एवढे नाव कमवले आहे. ती दिसायला खुपच सुंदर आहे. त्यासोबतच ती चित्रपटांमध्ये अतिशय साध्या कपड्यांमध्ये दिसते. कधीच छोटे कपडे घातल नाही. कारण ते तिला आवडत नाही.

खऱ्या आयुष्यात देखील किर्ती सुरेश खुप साधी राहते. तिचा हाच अंदाज तिच्या फॅन्सला आवडतो. म्हणून ती एवढी प्रसिद्ध आहे. किर्तीच्या चित्रपटांमध्ये बोल्डनेस नसतो. पण तरीही आज तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर करोडोची कमाई करतात.

किर्तीने ‘महानटी’ सारख्या सुपरहिट चित्रपटामध्ये काम केले आहे. या चित्रपटासाठी किर्तीला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तिचा अभिनय खुप दमदार असतो. म्हणून तिने एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

चित्रपट साइन करण्यापूर्वी किर्ती सुरेश चित्रपटाची स्क्रिप्ट नीट वाचते. त्यात बोल्ड सीन्स असतील तर ती लगेच त्या चित्रपटाला नकार देते. करोडो रुपये दिले तरी ती किसिंग सीन आणि बोल्ड सीन करत नाही. निर्मात्यांना पहिलंच सांगते की मी बोल्ड सीन्स करणार नाही.

एका मुलाखतीमध्ये किर्ती सुरेश म्हणाली होती की, ‘तुम्हाला यश मिळवण्यासाठी बोल्ड सीन्स करायची किंवा अंगप्रदर्शन करायची गरज नाही. तुम्ही मन लावून काम करा. तुम्हाला त्यात नक्कीच यश मिळेल. मला जसे राहायला आवडत मी तशीच राहते आणि लोकांना ते आवडते’.

किर्ती सुरेशवर लहानपणापासूनच अभिनयाचे संस्कार झाले आहेत. कारण तिची आई अभिनेत्री आहे. तर वडील साऊथचे खुप मोठे दिग्दर्शक आहेत. किर्ती देखील आत्ता साऊथची सुपरस्टार झाली आहे. आज जगभरात कीर्तीचे फॅन्स आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

सनी देओलचे करिअर खराब करायच्या चक्करमध्ये महेश भट्टने स्वतः च्या मुलीचे करिअर खराब केले

‘ही’ बालकलाकार आठवते का? ८० च्या दशकातील अनेक चित्रपटात केले आहे काम

गोविंदाच्या मुलीचे फोटो पाहिले का? दिसते खूपच हॉट आणि सुंदर

ब्लॅक चित्रपटासाठी अमिताभ बच्चनने फुकट काम केले होते; कारण ऐकल्यावर अभिमान वाटेल

माझा नवरा ‘या’ बाॅलीवूड अभिनेत्रींना ड्र.ग पुरवतो; अभिनेत्रीचा नावासकट जाहीर गौप्यस्फोट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.