सर्वांची पोल खोलणाऱ्या करण जोहरला सलमान खानने त्याच्या पहिल्याच चित्रपटात रडवले होते

बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आणि दिग्दर्शक आहेत जे त्यांच्या कामासाठी प्रसिद्ध आहेत. पण त्याचसोबत असेही काही कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते आहेत जे त्यांच्या बोलण्यासाठी खुप प्रसिद्ध आहेत.

असेच एक नाव म्हणजे करण जोहर. करण जोहर त्याच्या चित्रपटांपेक्षा जास्त त्याच्या खऱ्या आयुष्यासाठी खुप जास्त प्रसिद्ध आहे. सध्या बॉलीवूडमध्ये सर्वात जास्त चर्चेत असणाऱ्या व्यक्तींंमध्ये करण जोहरचे नाव येते.

करण जोहरला आपण सर्वांनी अनेकदा बडबड करताना पाहिले आहे. करण जोहर त्याच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमूळे देखील खुप वेळेस चर्चेत असतो. या शोमध्ये तो बॉलीवूड कलाकारांचे अनेक रहस्य उघड करतो.

आज आम्ही तुम्हाला करण जोहरच्या एका रहस्याबद्दल सांगणार आहोत. अनेकांना रडवणाऱ्या करण जोहरला एका अभिनेत्याने त्याच्या पहिल्याच चित्रपटात रडवले होते. हा अभिनेता होता बॉलीवूडचा भाईजान सलमान खान.

सलमान खान त्याची प्रत्येक गोष्ट मुडनुसार करत असतो. त्याचा स्वभाव खुप वेगळा आहे. त्याला एखाद्याचा राग आला. तर तो त्या व्यक्तीला कधीच माफ करत नाही. जर त्याने एखाद्याची मस्करी करण्याचे ठरवले. तर मग त्या व्यक्तीला रडूनच सोडतो.

अशीच मस्करी सलमान खानने करण जोहरसोबत केली होती. करण जोहर बॉलीवूडमध्ये नवीन होता. तो ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाचे दिग्दर्शन करत होता. या चित्रपटात त्याने शाहरुख खान, काजोल, राणी मुखर्जी आणि सलमान खानला मुख्य भुमिकेत घेतले होते.

असे बोलले जाते की, शाहरुख खानच्या सांगण्यावरून करणने सलमानला या चित्रपटात घेतले होते. पण करणला सलमानची खुप भीती वाटत होती. कारण सलमान खानच्या रागाबद्दल त्याने खुप काही ऐकले होते. त्याच्यासोबत काम करायला तो घाबरत होता.

या चित्रपटाची शुटिंग पुर्ण होत आली होती. फक्त सलमान खानची शुटिंग बाकी होती. करणने सलमानसोबत शुट करण्याची सगळी तयारी केली होती. त्याला खुप भीती वाटत होती म्हणून त्याने सीनच्या जागी सलमानसोबत पहिले गाणं शुट करण्याचा निर्णय घेतला.

या गाण्याच्या शुटिंगची सगळी तयारी झाली होती. सेटवर सर्वजण सलमानची वाट बघत होते. करण सलमानला डायरेक्ट करायचं म्हणून खुप जास्त टेन्शनमध्ये होता. सलमानला राग येणार नाही म्हणून तो सर्व गोष्टींची काळजी घेत होता.

गाण्याच्या शुटसाठी सलमानसाठी एक ड्रेस तयार करून ठेवण्यात आला होता. सलमान ज्यावेळी सेटवर आला त्यावेळी तो टि शर्ट आणि जीन्स अशा साध्या कपड्यात होता. त्याचा मुड चांगला होता. तो मस्करीच्या मुडमध्ये होता. करणने त्याला ड्रेस दिला आणि तयार होऊन शुटिंगसाठी यायला सांगितले.

त्यावेळी सलमान करणला म्हणाला की, ‘मला असे वाटतं आहे की गाण्यासाठी हाच ड्रेस परफेक्ट आहे. मी ड्रेस बदलणार आहे. आपण जीन्सवर शुटिंग करु. एवढं बोलून सलमान तिथून निघून गेला. हे ऐकून करण मात्र टेन्शनमध्ये आला.

करणला काय करावं काही कळत नव्हते. सलमानला कस तयार करावं? याचा तो विचार करत होता. सलमानला कोणीतरी सांगितले की, तुमच्यासोबत शुट करायचे आहे. म्हणून करण खुप टेन्शनमध्ये आहे. हे ऐकताच सलमानने हे नाटक अजून वाढवले.

तो खूप रागात सेटवर गेला आणि त्याने चिडचिड करायला सुरुवात केली. सलमानला रागात बघून करण घाबरला आणि त्याने रडायला सुरुवात केली. हे पाहून सलमानला हसू येत होते. पण त्याने करणला सांगितले नाही की तो मस्करी करत आहे.

शेवटी सलमानने रागात करणच्या आवडीचे कपडे घातले आणि शुटिंग सुरू केली. चित्रपटाची पुर्ण शुटिंग झाली. तरी सलमानने करणला सांगितले नाही की, तो त्याची मस्करी करत होता. सलमानच्या रागाला पाहून करणने परत कधीच त्याच्यासोबत काम केले नाही.

चित्रपट होऊन पंधरा वर्षे झाल्यानंतर सलमानने या रहस्यवरून पडदा काढला. तो म्हणाला की, ‘करण जोहर त्याच्या पहिल्याच चित्रपटात रडला होता. पण त्याने ही गोष्ट रहस्यमयी ठेवली आणि मी त्याचे हे रहस्य सांगतो. पण सर्वात मोठे रहस्य म्हणजे मी त्यावेळी चिडलो नव्हतो. मी करणची मस्करी करत होतो’.

महत्त्वाच्या बातम्या –

तुम्हाला माहीत नसेल पण शाहरूखने एकदा दोनदा नाही तर चक्क तीन वेळा लग्न केले आहे; वाचा पुर्ण किस्सा

..म्हणून आमीर खान बाॅलीवूडपासून दूर राहतो; स्वत: आमीरनेच सांगीतली बाॅलीवूडची काळी बाजू

पानटपरी चालवनारे भाऊ कदम अख्ख्या महाराष्ट्राचे हास्यसम्राट झाले; पहा कसा झाला हा चमत्कार

गर्लफ्रेंडसाठी खूप काही केले, चूक नसताना माफी मागीतली; तरीही अजून एकटाच आहे..

तारक मेहतातील जेठालालचे मानधन ऐकून होश उडतील; मोठमोठ्या सेलिब्रीटींना टाकलय मागे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.