दिलफेक सैफ अली खानला प्रीती झिंटामुळे खावा लागला होता बायको अमृताचा मार

फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक वेळा अभिनेत्रींमूळे कलाकारांची घरं उध्वस्त झाली आहेत. म्हणून अनेक अभिनेत्रींना बॉलीवूडमध्ये होम ब्रेकर बोलले जाते. प्रीती झिंटा देखील अशाच अभिनेत्रीं पैकी एक आहे. प्रीती झिंटाला तिच्या करिअरच्या सुरुवातीला होम ब्रेकर बोलले जात होते.

प्रीती झिंटाने बॉलीवूडमध्ये प्रवेश केल्यानंतर खुप कमी वेळात यश मिळवले होते. तिला बॉलीवूडची डिंपल ब्युटी म्हणून ओळखले जाते. तिने ‘क्या केहना’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये प्रवेश केला होता. अभिनेत्री होण्याअगोदर प्रीती झिंटा मॉडेल म्हणून काम करत होती.

क्या केहना चित्रपट प्रीतीने साइन केला होता. या चित्रपटामध्ये प्रीती झिंटासोबत सैफ अली खान, अनुपम खेर, चंद्रचूर सिंह हे अभिनेते काम करत होते. या चित्रपटाच्या शुटिंग वेळी प्रीती झिंटा आणि सैफ अली खानमध्ये खुप चांगली मैत्री झाली होती.

चित्रपटाच्या शुटिंग वेळी या दोघांमध्ये खुप चांगली मैत्री झाली होती. दोघे एकमेकांसोबत खुप जास्त टाईम घालवत होते. म्हणून या दोघांच्या अफेअरच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या होत्या. अनेक ठिकाणी या दोघांच्या रिलेशनशिपबद्दल बोलले जात होते.

सैफ अली खान अगोदरपासूनच विवाहित होता. सैफने अभिनेत्री अमृता सिंगसोबत लग्न केले होते. त्यांना मुलं देखील होते. सैफ आणि अमृतामध्ये खुप चांगले नातं होते. या दोघांची लव्ह मॅरेज होती. हे दोघे आपल्या संसारात खुप आनंदी होते.

पण प्रीती झिंटाच्या एन्ट्रीमूळे मात्र या दोघांच्या नात्यामध्ये दरार निर्माण झाली होती. प्रीती झिंटा आणि सैफ अली खानच्या अफेअरच्या चर्चा खुप जास्त वाढत होत्या. म्हणून सैफ आणि अमृतामध्ये भांडण सुरू झाली होती.

क्या केहना चित्रपटाच्या शुटिंग वेळी सैफ आणि अमृतामध्ये खुप जास्त जवळीक वाढली होती. या दोघांच्या प्रेम प्रकरणामूळे अमृता खुप जास्त भडकली होती. अमृताने अफेअरच्या बातम्यांना कंटाळून सैफसोबत भांडण केले होते.

प्रीती झिंटामुळे अमृता सिंग सैफ अली खानच्या चित्रपटाच्या सेटवर जायची. एवढेच नाही तर अमृताने प्रीतीला सैफपासून दुर राहण्याची धमकी दिली होती. सैफपासून दुर राहा. नाही तर तुझे करिअर होऊ देणार नाही. असे प्रीतीला सांगितले होते.

पण प्रीती मात्र अमृताच्या धमकीला घाबरली नाही. सैफ आणि प्रीतीचे अफेअर सुरू होते. सैफ प्रीतीसाठी त्याच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करत होता. म्हणून अमृताने एकदा रागारागात सैफच्या कानाखाली वाजवली होती. त्यासोबतच सैफला घटस्फोट देण्याची धमकी दिली.

सैफचे आपल्या मुलांवर खूप प्रेम होते. म्हणून त्याने प्रीती झिंटाला सोडण्याचा निर्णय घेतला. तो प्रीती झिंटापासून लांब राहू लागला. पण सैफच्या अफेअरच्या चर्चा सुरू होत्या. सैफचे नाव प्रीतीनंतर विदेशी मॉडेल रोजासोबत जोडले गेले.

सैफच्या अफेअरच्या बातम्यांमुळे अमृताने सैफसोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. ती मुलांना घेऊन सैफपासून लांब राहू लागली. या कालावधीमध्ये सैफने प्रीती झिंटासोबत ‘सलाम नमस्ते’ चित्रपट साइन केला. ही गोष्ट अमृताला समजल्यानंतर ती खूप भडकली आणि तिने घटस्फोटासाठी अर्ज केला.

महत्त्वाच्या बातम्या –

रजनीकांत आणि माधुरी दीक्षितची जवळीक वाढत होती; म्हणून दिग्दर्शकाने चित्रपटाची स्क्रिप्ट बदलली

राजेश खन्नाच्या करिअरचा शेवट यश चोप्रामूळे झाला होता?

म्हणून आई अमृता साराला म्हणाली होती तु तर भिकारी दिसत होतीस

श्रीदेवी आणि कमल हसनच्या नात्याचे ‘हे’ सत्य तुम्हाला माहीती आहे का?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.