भाजप सरकारमुळेच लक्ष्मी, दुर्गा आणि सरस्वतींची शक्ती कमी झाली – राहूल गांधी

दोन दिवसांच्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आलेले काँग्रेस जेष्ठ नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी भाजप – आरएसएसवर निशाणा साधत म्हणाले की, सरकारच्या निर्णयामुळे देवी दुर्गा, लक्ष्मी, आणि सरस्वतींची शक्ती कमी झाली आहे.

सरकारच्या कृषी कायदा, जीएसटी, नोटबंदी यामुळेच त्रिशक्तींची शक्ती कमी झाली आहे. यावेळी त्यांनी भाजप-आरएसएसने जम्मू काश्मीरची संमिश्र संस्कृती नष्ट केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दोन्ही संघटना लोकांमधील प्रेम आणि बंधुभाव नष्ट करत असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले.

यावेळी राहुल गांधी म्हणाले, ” काल मी वैष्णो मातेच्या मंदिरात गेलो. जेव्हा मी वैष्णो देवीच्या मंदिरात गेलो होतो, तेव्हा तिथे त्रिशक्ती होत्या- दुर्गा जी, लक्ष्मी जी, आणि सरस्वती जी. ‘दुर्गा जी’ ज्याला आपण दुर्गा माँ म्हणतो, दुर्गा हा शब्द ‘दुर्ग’ वरून आला आहे. दुर्गा माँ म्हणजे संरक्षण करणारी शक्ती.

पुढे ते म्हणाले, ” लक्ष्मी माँ म्हणजे ‘ध्येय’. लक्ष्मी माँ म्हणजे ध्येय पूर्ण करणारी शक्ती, जर तुमचे ध्येय पैसे असेल तर तुम्ही जे सांगितले ते देखील खरे आहे. जर तुमचे ध्येय दुसरे काही असेल, तर ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्याला मिळणारी शक्ती म्हणजे लक्ष्मी माँ.

राहुल गांधी म्हणाले, ” सरस्वती जी ती शक्ती आहे, ज्याला आपण विदयेची देवी म्हणतो. या तीन शक्ती आहेत. जेव्हा या तीन शक्ती घरात किंवा देशात असतात तेव्हा देशाची प्रगती होते. भारतात जीएसटीमुळे माँ लक्ष्मीची शक्ती कमी झाली आहे की वाढली आहे? शेतकऱ्यांसाठी केलेल्या तीन काळ्या कायद्यांमुळे दुर्गा मातेची शक्ती कमी झाली की वाढली?

जेव्हा भारतातील प्रत्येक संस्था कॉलेज, आणि शाळेत आरआरएसचा एक व्यक्ती बसवला जातो, तेव्हा सरस्वती मातेची शक्ती कमी होते की वाढते? जे स्वतःला हिंदू बोलतात जे वैष्णो देवीला जाऊन पूजा करतात तेच त्यांच्या शक्तीचा अपमान करतात.” अशी टिका राहूल गांधी यांनी मोदी सरकारवर केली.

 

महत्वाच्या बातम्या
सोलापूरची चादर अमेरिकेत देतीय उब, निक जोनासचे चादरीपासून बनवलेला शर्ट घालून फोटोशूट
मोठी बातमी! बाळूमामाच्या नावाखाली अनेकांना लुटणाऱ्या मनोहर भोसलेला साताऱ्यातून अटक
ऍक्टींग सोडून राजकारणात उतरणार पंगा क्वीन; सांगितला आपला फ्युचर प्लॅन
एवढे पैसे असून काय उपयोग, वृद्धांला मदत न केल्याने लोक श्रद्धा कपूरवर भडकले; पहा व्हिडिओ…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.