जुही चावलाने स्वतःच्याच हाताने केले होते स्वतःचे नुकसान; करिश्मा कपूरला बनवले स्टार

फिल्म इंडस्ट्री कलाकारांना सहजासहजी यश मिळत नाही. यश मिळाल्यानंतर कलाकार हार मानत नाही. ते एका पेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये काम करतात. अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम करतात.

जुही चावला देखील अशाच कलाकारांपैकी एक आहे. तिला खुप कमी वेळेत इंडस्ट्रीमध्ये यश मिळाले होते. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. अनेक हिट चित्रपटांमध्ये आणि मोठ्या कलाकारांसोबत काम केले.

पण हे सगळं करत असताना जुहीने गोविंदासारख्या अभिनेत्यासोबत काम करायला नकार दिला होता. ज्यामुळे तिला खुप मोठे नुकसान देखील झाले होते. जाणून घेऊया हा पुर्ण किस्सा.

९० च्या दशकाच्या सुरुवातीला जुही चावला स्टार झाली होती. तर गोविंदाचे करिअर एवढे चांगले सुरू नव्हते. त्यांचे चित्रपट फ्लॉप होत होते. या कालावधीमध्ये डेविड धवनने जुही आणि गोविंदाला घेऊन चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला.

जुहीने चित्रपटाला होकार दिला. चित्रपटाची शुटींग सुरू झाली. या वेळेत यश चोप्राने जुहीला मोठ्या चित्रपटाची ऑफर दिली. त्या मोठ्या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी जुहीने गोविंदासोबत काम करायला नकार दिला आणि चित्रपट सोडून दिला.

ही गोष्ट गोविंदाला आवडली नाही. त्यांना जुहीचा खुप राग आला. गोविंदाने चित्रपटामध्ये जुहीच्या जागी करिश्मा कपूरला घेतले. त्यांनी करिश्माची मार्केटिंग करायला सुरुवात केली. ज्यामुळे ती चांगलीच प्रसिद्ध झाली.

ज्या चित्रपटामध्ये गोविंदा आणि जुही चावला एकत्र काम करणार होते. त्या सर्व चित्रपटांमध्ये गोविंदाने करिश्माला कपूरला घेतले. गोविंदा आणि करिश्माची जोडी हिट झाली होती. दोघांना एकत्र पाहणे लोकांना खुप आवडत होते.

तर दुसरीकडे जुहीने स्वतःचे नुकसान करून घेतले होते. एवढेच नाही तर तिने करिश्मा कपूरला स्टार बनवले होते. गोविंदा आणि जुहीने नंतर एकत्र काम केले. पण त्या दोघांच्या जोडी पेक्षा लोकांना गोविंदा आणि करिश्माची जोडी आवडते.

महत्त्वाच्या बातम्या –

टीव्हीवरील संस्कारी सून हिना खानचे ‘बिकिनीशूट’, आपल्या बोल्ड अंदाजात हिना करतेय चाहत्यांना घायाळ

१५०० रुपयांमध्ये विकली जात होती सैफीची बहीण सोहाची ती घाणेरडी सीडी; वाचा पुर्ण किस्सा

..म्हणून राजेश खन्नाने स्वतःचे चित्रपट पाहणे बंद केले होते

राजेश खन्नाच्या ‘त्या’ सल्ल्यावर डिंपल कपाडियाला झाले होते हसू अनावर; वाचा पुर्ण किस्सा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.