इंग्रजी येत नाही म्हणून मुलाखत सोडून पळून आला होता ‘हा’ अभिनेता; आज आहे सुपरस्टार

आजकाल प्रत्येक व्यक्तिला इंग्रजी येणे खुप गरजेचे आहे. तुम्हाला इंग्रजी बोलता येत असेल तर तुम्ही काहीही करु शकता. पण तुम्हाला इंग्रजी बोलता येत नसेल तर मग मात्र अनेक अडचणींचा सामना करावा लागोत. तुमच्याकडे आलेल्या संधी परत जातात.

असेच काही पंजाबी अभिनेता आणि सिंगर दिलजित दोसांजचे झाले होते. दिलजित पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक आहे. त्यासोबतच तो उत्तम अभिनेता देखील आहे. पंजाबीसोबतच दिलजितने हिंदीमध्ये देखील चांगलीच ओळख निर्माण केली.

काही दिवसांपूर्वीच दिलजितचा सुरज पे मंगल भारी चित्रपट रिलीज झाला होता. त्याच्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. पंजाबी इंडस्ट्रीतून बॉलीवूडमध्ये आल्यानंतर दिलजितने खुप कमी वेळात अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

दिलजित मुळचा पंजाबचा आहे. त्यामूळे त्याला हिंदी आणि इंग्रजी भाषा नीट बोलता येत नाही. त्याला इंग्लिश बोलता येत नाही म्हणून त्याने एका मोठ्या मॅगझिनची मुलाखत सोडली होती. दिलजितने स्वत या गोष्टीचा खुलासा केला होता.

दिलजित म्हणाला की, मला एका मोठ्या मॅगझिनने मुलाखतीसाठी बोलवले होते. त्यांनी मला फोटोशूटसाठी लंडनला बोलावले. मी त्यावेळी खुप आनंदी होतो. मी नवीन काही तरी करणार म्हणून उत्साही होतो. पण हा उत्साह जास्त काळ टिकू शकला नाही.

मी लंडनला पोहोचल्यानंतर त्यांनी मला सांगितले की, सुरुवातीला माझी मुलाखत घेतली जाईल. त्यानंतर मग माझा फोटोशूट होणार होता. हे ऐकल्यानंतर काही काळासाठी मी शॉक झालो होतो. कारण मी इंग्रजीमध्ये मुलाखत देऊ शकत नाही ही गोष्ट मला माहीती होती.

तेव्हा मी काहीही विचार न करता. त्या ठिकाणावरून निघून आलो. मी मुलाखतीमधून पळून आलो होतो. त्या गोष्टीचे मला आयूष्यभर वाईट वाटत राहणार आहे. मला इंग्रजी बोलता येत नाही म्हणून एवढी मोठी संधी गमवली होती. त्यानंतर मी इंग्रजी शिकण्याचा निर्णय घेतला.

दिलजित हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांवर काम करत आहे. लवकरच तो चांगला इंग्रजी बोलू शकणार आहे. सध्याच्या घडीला दिलजित त्याच्या बॉलीवूड आणि पंजाबी दोन्ही चित्रपटांवर काम करत आहे. लवकरच तो एका नवीन प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

रितेश आणि जेनेलियाची फॉरेव्हरवाली लव्ह स्टोरी; दोघांचा रोमॅंटिक व्हिडीओ झाला व्हायरल

प्रियंका चोप्राच्या सासूला बघून तुम्ही व्हाल घायाळ; दिसते खुपच कमाल

अजय देवगणची मेव्हणी दिसते खूपच हॉट; फोटो पाहून घायाळ व्हाल

बाळासाहेब ठाकरे यांच्या एका धमकीनंतर शाहरुख खानची हवा झाली होती टाईट मग..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.