दिलीप कुमारमूळे गोविंदा २५ चित्रपट गमवावे लागले होते; कारण ऐकून तर विश्वास नाही बसणार

सुपरस्टार गोविंदा आज भलेही चित्रपटांपासून लांब राहत असतील. पण एक काळ असा होता ज्यावेळी बॉलीवूडमध्ये गोविंदाच्या नावाचा सिक्का चालायचा. गोविंदा ज्या चित्रपटामध्ये काम करायचे. तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट व्हायचा. म्हणून अनेक दिग्दर्शक गोविंदासोबत काम करायला तयार असायचे.

९० च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या गोविंदाने त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला २५ चित्रपटांना नकार दिला होता. कारण अभिनेते दिलीप कुमारने गोविंदाला असे करायला सांगितले होते. जाणून घेऊया हा पुर्ण किस्सा.

गोविंदाने १९८६ मध्ये बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता. पहिल्याच चित्रपटापासून त्याला बॉलीवूडमध्ये चांगले यश मिळाले होते. म्हणून त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. गोविंदा देखील प्रत्येक चित्रपट साइन करत होता. खुपच कमी वेळात तो चित्रपटाच्या स्क्रिप्ट न वाचून चित्रपट साइन करायचा.

खुप कमी लोकांना माहीती असेल की, गोविंदाचे वडील निर्माते होते. पण तरीही त्यांच्या घरात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणी असायच्या. घरात गोविंदा मोठे होते. म्हणून पुर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांला पैसे कमावणे खुप गरजेचे होते.

गोविंदाला पैशांची खुप जास्त गरज असायची. त्यांना चित्रपट साइन केल्यानंतर पैसे मिळायचे. म्हणून ते अनेक वेळा चित्रपटाच्या स्क्रिप्टकडे लक्ष न देता चित्रपट साइन करायचे. एकदा तर त्यांनी ७५ चित्रपट साइन केले होते.

गोविंदा एकदाच एवढे चित्रपट साइन करतो. ही गोष्ट
फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना आवडली नाही. अनेक कलाकारांना या गोष्टीचा राग आला. करिअरच्या सुरुवातीलाच गोविंदाला एवढे यश मिळाले. ही गोष्ट दुसऱ्या अभिनेत्यांना आवडली नाही.

म्हणून फिल्म इंडस्ट्रीतील सर्व कलाकारांनी या गोष्टीची तक्रार अभिनेते दिलीप कुमार यांच्याकडे केली. त्यांनी दिलीप कुमारला सांगितले की, ‘गोविंदा नवीन आहे. पण तरीही तो अनेक चित्रपट साइन करत आहे. त्यामुळे दुसऱ्या अभिनेत्यांना काम मिळत नाही. तुम्ही याबद्दल त्याच्याशी बोला आणि काहीतरी करा’.

दिलीप कुमारने गोविंदाचे चित्रपट पाहिले होते. त्यांना माहिती होते की, गोविंदा उत्तम अभिनेता आहे. पण फिल्म इंडस्ट्रीतील लोकांचे बोलणे देखील ते टाळू शकत नव्हते. यावर त्यांनी एक पर्याय शोधला आणि गोविंदाला भेटायला बोलवले. नेहमी उशिरा येणारे गोविंदा त्या दिवशी मात्र वेळेत दिलीप कुमारला भेटायला पोहोचले.

कारण गोविंदा दिलीप कुमारला गुरू मानत होते. ते दिलीप कुमारचा खुप आदर करत होते. पण त्या दिवशी त्यांचे बोलणे ऐकून गोविंदाला धक्का बसला. दिलीप कुमार गोविंदाला म्हणाले की, ‘तु खुप चांगले काम करत आहेस. पण खुप घाई देखील करत आहेस. तु चांगला अभिनेता आहेस. तुला यश नक्कीच मिळेल’.

ते पुढे म्हणाले की, ‘तुझा अभिनय चांगला आहे. पण चित्रपटांची निवड चांगली नाही. चित्रपट निवडताना तु वेळ घे. चित्रपटाची स्क्रिप्ट वाच आणि मग चित्रपट साइन कर. पैशांसाठी चित्रपट साइन करू नको. त्याचा परिणाम तुझ्या करिअरवर होईल. चांगले चित्रपट साईन केले तर पैसे देखील चांगले मिळतील. म्हणून आत्ता तू काही चित्रपट सोडून दे’.

गोविंदा आपल्या गुरूला नाही बोलू शकत नव्हते. त्यांनी दिलीप कुमारचे म्हणणे ऐकले. दिलीप कुमारच्या सांगण्यावरून गोविंदाने २५ चित्रपट सोडून दिले होते. त्यानंतरही गोविंदाकडे ५० चित्रपट होते. गोविंदा एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते की, ‘दिलीप कुमारचा महत्त्वाचा सल्ला मी ऐकला म्हणून मला एवढे यश मिळाले आहे’.

महत्त्वाच्या बातम्या –

७० च्या दशकातील टॉपच्या अभिनेत्रीची आज झाली आहे ‘अशी’ अवस्थता; पहा फोटो

लग्नाला होकार देण्या अगोदर ट्विंकलने अक्षयसमोर ठेवली होती ‘ही’ अट

साऊथच्या अभिनेत्रीच्या प्रेमात पागल झाले होते कपिल देव; केली होती लग्नाची तयारी

‘अजयचा मॅटर झालाय हा फोन येताच त्याचा बाप २०० फायटर पोरं घेऊन स्पाॅटवर पोहोचला’

त्या दिवशी जुही चावलाची माफी मागून रडत होते अभिनेते फिरोज खान

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.