श्रीदेवीच्या लाईव्ह शो दरम्यान धर्मेंद्रने दारु पिऊन केला होता तमाशा कारण…

अनेक वेळा लाईव्ह कार्यक्रमांमध्ये अनेक गोष्टी होत असतात. यामुळे स्टेजवर परफॉर्मन्स करणाऱ्या कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. असेच काही अभिनेत्री श्रीदेवीसोबत झाले होते. त्यांना लाईव्ह स्टेजवरून निघून जावे लागले होते.

हा किस्सा आहे ८० च्या दशकातील. त्यावेळी श्रीदेवी त्यांच्या करिअरच्या टॉपवर होत्या. त्यांनी ‘मिस्टर इंडिया’सारख्या सुपरहिट चित्रपटामध्ये काम केले होते. त्यांना बॉलीवूडच्या पहिल्या लेडी सुपरस्टार म्हणून ओळखले जाते.

प्रेक्षकांसोबत फिल्म इंडस्ट्रीतील लोकांमध्ये देखील श्रीदेवीचे खुप जास्त वेडं होते. त्यांना चित्रपटामध्ये घेण्यासाठी निर्माते आणि दिग्दर्शक खुप प्रयत्न करायचे. त्यांनी चित्रपटामध्ये काम करावे म्हणून अभिनेते वर्षभर त्यांच्या होकाराची वाट बघायचे.

श्रीदेवीचा मिस्टर इंडिया चित्रपट रिलीज झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. त्यासोबतच या चित्रपटातील गाणे देखील खुप जास्त हिट झाली होती. खास करून ‘हवा हवाई’ गाणं सुपरहिट झाले होते.

प्रत्येक कार्यक्रमामध्ये हे गाणं असायचे. बॉलीवूडमध्ये देखील हे गाणं खुप हिट झाले होते. बॉलीवूडच्या अनेक कार्यक्रमांमध्ये हे गाणं वाजवले जात होते. त्यासोबतच अनेक ठिकाणी स्टेज शोसाठी श्रीदेवीला बोलवले जात होते.

श्रीदेवी देखील खुप जास्त पैसे घेऊन या गाण्यावर परफॉर्मन्स करायच्या. असाच एक कार्यक्रम मुंबईत ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून धर्मेंद्रला बोलवण्यात आले होते. तर श्रीदेवी लाईव्ह परफॉर्मन्स देणार होत्या.

धर्मेंद्रच्या दारू पिण्याच्या सवयीबद्दल सगळ्या फिल्म इंडस्ट्रीला माहीती होते. अनेकांनी धर्मेंद्र नशेत असताना त्यांच्या रागाचा सामना केला होता. श्रीदेवीने देखील त्या दिवशी धर्मेंद्रच्या रागाचा सामना केला होता.

कार्यक्रम सुरू झाल्यानंतर श्रीदेवीने हवा हवाई गाण्यावर परफॉर्मन्स सुरू केला. थोडा वेळ झाल्यानंतर नशेत असलेले धर्मेंद्र स्टेजवर आले आणि त्यांनी कार्यक्रम थांबवला. त्यांनी माईक घेतला आणि मिस्टर इंडिया चित्रपटाच्या निर्मात्यांना शिव्या द्यायला सुरुवात केली.

ही गोष्ट श्रीदेवीला आवडली नाही. म्हणून त्यांनी धर्मेंद्रच्या हातातून माईक घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी धर्मेंद्रने रागात श्रीदेवीकडे पाहिले. धर्मेंद्रचा राग पाहून श्रीदेवी घाबरल्या आणि त्या स्टेज सोडून पळून गेल्या. धर्मेंद्र मात्र कोणाचेही ऐकत नव्हते.

धर्मेंद्रचे म्हणणे होते की, हवा हवाई हे गाणं धर्मेंद्रच्या ‘फुल और कांटे’ चित्रपटातून कॉपी करून घेतले होते. म्हणून त्यांचा मिस्टर इंडिया चित्रपटाच्या निर्मात्यांवर राग होता. याच कारणामुळे त्यांनी श्रीदेवीसोबत काम करायला नकार दिला होता.

धर्मेंद्रने त्यांचे बोलणे संपवले आणि ते बॅक स्टेजवर गेले. तिथे श्रीदेवी रडत बसल्या होत्या. श्रीदेवीला रडताना पाहून धर्मेंद्रला खुप वाईट वाटले. त्यांनी हात जोडून श्रीदेवीची माफी मागितली आणि परत एकदा नव्याने कार्यक्रमाची सुरुवात केली.

महत्त्वाच्या बातम्या –

साध्या भोळ्या अजय देवगनचे होते अनेक अभिनेत्रींसोबत अफेअर; पहा कोण आहेत त्या

मनोजकुमारने डिंपलला रात्री १२ वाजता फोन करून हाॅटेलवर बोलावले व दिली ‘ही’ ऑफर

जिगरी दोस्त राजेश खन्ना आणि यश चोप्राची मैत्री तुटण्यामागे आहे ‘हे’ कारण

दिलफेक सैफ अली खानला प्रीती झिंटामुळे खावा लागला होता बायको अमृताचा मार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.