त्या दिवशी शाहरुखला त्याचा राग पडला होता महागात, झाली होती आयुष्यातली पहिली जेलवारी

बॉलीवूड आणि वाद हे काही नवीन नाही. बॉलीवूडचे वादासोबत खुप जुने नाते आहे. अनेकदा बॉलीवूडचे मोठे मोठे कलाकार वादाच्या भवऱ्यात अडकतात. तर काही वेळेस हे वाद एवढे वाढतात की कलाकारांना जेलची हवा खावी लागते.

आत्तापर्यंत बॉलीवूडचे अनेक कलाकार जेलमध्ये जाऊन आले आहेत. अशाच एका वादामुळे बॉलीवूडचा किंग शाहरुख खान देखील जेलमध्ये जाऊन आला आहे. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल. पण ही गोष्ट खरी आहे. हा किस्सा आहे ९० च्या दशकातील.

शाहरुख खान त्याच्या एका चित्रपटाची शुटिंग करत होता. या चित्रपटाचे नाव होते ‘माया मेमसाब’. असे बोलले जाते हा चित्रपट ९० च्या दशकात खुप जास्त चर्चेत होता. कारण या चित्रपटामध्ये अनेक बोल्ड सीन्स होते. या चित्रपटात दिपा साही मुख्य भुमिकेत होती.

हा चित्रपट स्त्रीप्रधान होता. माया मेमसाब चित्रपटामध्ये शाहरुख खान देखील महत्त्वाची भुमिका निभावत होता. चित्रपटामध्ये शाहरुख खान आणि दिपा साहीमध्ये अनेक बोल्ड सीन्स होते.
त्यामुळे त्यावेळी या गोष्टीची खुप जास्त चर्चा होत होती.

म्हणून एका मॅगझीनने त्यांच्या आर्टिकलमध्ये लिहिले होते की, या चित्रपटात अनेक बोल्ड सीन्स आहेत. हे सीन शुट करण्याच्या एक दिवस अगोदर शाहरुख खान आणि दिपाने या सीन्सची तयारी केली होती. त्यासाठी हे दोघे एका रात्री भेटले होते.

ही गोष्ट शाहरुख खानला समजली तेव्हा तो खुप जास्त चिडला. शाहरुख रागा रागात त्या मॅगझीनच्या ऑफिसमध्ये गेला. त्याने तिथे अनेक लोकांसोबत वाद केले. त्यांना शिव्या दिल्या. एवढेच नाही तर मॅगझीनच्या संपादकाला जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यामुळे हे प्रकरण खुप जास्त बिघडले. त्या मॅगझीनच्या संपादकाने शाहरुख खान विरोधात एफआयआर दाखल केली. म्हणून शाहरुखच्या अडचणी खुप जास्त वाढल्या. दुसऱ्या दिवशी तो त्याच्या चित्रपटाची शुटिंग करत होता.

त्याच्या चित्रपटाच्या सेटवर पोलिस आले. पोलिसांनी शाहरुख खानला जीपमध्ये बसण्यास सांगितले. त्यावेळी शाहरुखला समजले की, त्याचे कालचे भांडण त्याला महागात पडणार आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले.

एक दिवस पोलिस स्टेशनमध्ये राहिल्यानंतर शाहरुखला दुसऱ्या दिवशी सोडण्यात आले. त्या वेळेस या गोष्टीची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. अनेक वर्तमान पत्रांमध्ये ही बातमी आली होती. त्यामुळे शाहरुखची खुप जास्त बदनामी देखील झाली होती.

याबद्दल शाहरुख खान एका मुलाखतीमध्ये म्हणाला होता की, ‘त्यावेळी माझा राग मला महागात पडला होता. मी जेवढा राग केला नसता तर माझ्यावर अशी वेळ आली नसती. पण चुक फक्त माझी नाही. त्या पत्रकाराने जर माझ्याबद्दल चुकीच्या गोष्टी छापल्या नसत्या. तर मी चिडलो नसतो. काही चुकी त्यांची पण आहे’.

महत्त्वाच्या बातम्या –

त्याचे खायचे व दाखवायचे दात वेगळे आहेत; गोविंदाने केली करण जोहरची पोलखोल

…म्हणून मीनाक्षी शेषाद्रीने लग्नानंतर बॉलीवूड सोडले

सलमान खानसोबत काम करायला बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने दिला होता नकार

अलका कुबलच्या मुलींचे फोटो पाहून थक्क व्हाल; सौंदर्यात मोठमोठ्या अभिनेत्रींना देतात टक्कर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.