अमिताभ बच्चनने बोनी कपूरला बनवले होते भिकारी; जाणून घ्या कारण

फिल्म इंडस्ट्रीतील काही मोठ्या निर्मात्यांमध्ये बोनी कपूरच्या नावाचा समावेश होतो. ८० आणि ९० च्या दशकात बोनीने अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली होती. त्यामूळे त्यांना बॉलीवूडच्या मोठ्या निर्मात्यांपैकी एक समजले जाते.

बोनीने अभिनेत्री श्रीदेवीसोबत लग्न केले होते. श्रीदेवी देखील बॉलीवूडची सुपरस्टार होती. त्यामुळे या दोघांकडे कधीही पैशांची कमी नव्हती. दोघे आरामाचे आयुष्य जगत होते. पण एका काळानंतर मात्र हे सगळं काही बदलून गेले.

फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारे बोनी पैशांसाठी तरसु लागले. असे बोलले जाते की, तर श्रीदेवीमूळे त्यांच्यावर एवढी वाईट वेळ आली होती. बोनीकडे बिलकुल पैसे नव्हते. म्हणून श्रीदेवीला परत अभिनय क्षेत्रात यावे लागले. पण यामागचे खरे कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

बोनी कपूर २००३ मध्ये ‘क्यूँ हो गया ना’ चित्रपटावर काम करत होते. चित्रपटात ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉय मुख्य भुमिकेत होते. बोनीची इच्छा होती की, अमिताभ बच्चनने या चित्रपटात काम करावे. पण त्यांनी मात्र सरळ सरळ नकार दिला.

बोनी कपूर मात्र नकार ऐकायला तयार नव्हते. शेवटी अमिताभने चित्रपटाला होकार दिला. पण त्यांनी बोनी कपूरसमोर एक अट ठेवली. अमिताभने सांगितले की, ‘मी या चित्रपटात काम करायला तयार आहे. पण तुम्ही मला शब्द द्या की, तुम्ही तुमच्या पुढच्या चित्रपटात अभिषेकला घेणार’.

हे ऐकून बोनी शॉक झाले. त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. म्हणून त्यांनी अमिताभची अट मान्य केली. पण त्यामुळे त्यांचे खुप नुकसान झाले. कारण क्यू हो गया ना चित्रपट फ्लॉप झाला. त्यांनी अभिषेकला घेऊन ‘रन’ चित्रपट बनवला. तो ही चित्रपट फ्लॉप झाला.

अभिषेकने करिअरची सुरुवात केल्यापासून फक्त फ्लॉप चित्रपट दिले होते. त्यात रन चित्रपटही फ्लॉप झाला. म्हणून अभिषेक दुखी झाला. तर बोनी कपूरचे दिवाळे निघाले. दोन दोन फ्लॉप चित्रपटांमूळे बोनीचे करोडोंचे नुकसान झाले आणि तो रातोरात रस्त्यावर आला.

अमिताभ बच्चनच्या एका अटीमुळे बोनी कपूर भिकारी झाला होता. पण तो काहीही करु शकत नव्हता. शेवटी घरातील आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी श्रीदेवीला अभिनयात कमबॅक करावे लागले. त्यानंतर काही वर्षांनी त्यांची परिस्थिती नीट झाली.

महत्त्वाच्या बातम्या –

शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूतने कॅमेऱ्यासमोरच धडाधड बदलले कपडे; पहा व्हिडिओ..

अभिषेक बच्चनने सांगितले खरे कारण, ‘या’कारणामुळे त्याने कधी ऐश्वर्यासोबत किसिंग सीन नाही दिला

लाडकी दयाबेन दिशा वकानी पुन्हा एकदा दिसणार तारक मेहतामध्ये; पहा गरब्याचा स्पेशल व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.