अक्षयने अशी काय जादू केली की एकमेकाचे तोंडही न पाहणारे राजेश खन्ना व डिंपल एकत्र राहू लागले

फिल्म इंडस्ट्रीमध्ये आजपर्यंत अनेक प्रसिद्ध जोड्या झाल्या आहेत. या जोड्यांना एकत्र पाहणे प्रेक्षकांना खुप आवडते. याच जोडींमधली एक जोडी म्हणजे राजेश खन्ना आणि डिंपल कपाडियाची. लोकांना या दोघांची खऱ्या आयूष्यातील जोडी खुप आवडत होती.

राजेश खन्ना इंडस्ट्रीतील सर्वात मोठे स्टार होते. त्यांच्यासारखे स्टारडम दुसऱ्या कोणत्याही कलाकाराने पाहीले नाही. लाखो तरुणींचे त्यांच्यावर प्रेम होते. पण ते मात्र अभिनेत्री डिंपल कपाडियाच्या प्रेमात पडले होते.

दोघांची पहीली भेट अहमदाबादमध्ये एका कार्यक्रमामध्ये झाली होती. कार्यक्रमामध्ये डिंपलला पाहताच क्षणी राजेश खन्ना त्यांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर दोघांच्या भेटी वाढत गेल्या आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

तीन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी १९७३ मध्ये डिंपलले १५ वर्ष मोठ्या राजेश खन्नासोबत लग्न केले होते. लग्नानंतर डिंपलने चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले होती. त्यांना रिंकी आणि ट्विंकल या दोन मुली झाल्या. पण त्यांचा संसार जास्त काळ टिकू शकला नाही.

१९८२ मध्ये दोघे वेगळे झाले. आपल्या दोन्ही मुलींना घेऊन डिंपल आई वडीलांसोबत राहत होत्या. घटस्फोट न घेता त्यांनी वेगळं राहायला सुरुवात केली होती. दोघांमधले भांडण दिवसेंदिवस वाढतच होते. म्हणून त्यांनी परत कधीच एकत्र यायचे नाही असा निर्णय घेतला होता.

पण वेळेनूसार दोघांमधले वाद कमी झाले. एक काळ असा आला. ज्यावेळी राजेश खन्नाला एकटेपणा सतावत होता. त्यांना एकटे राहायला आवडत नव्हते. त्यांचे हे दुख त्यांचा जावई अक्षय कुमारला समजले होते. म्हणून अक्षयने आपल्या सासू सासऱ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला.

अक्षयला या प्रयत्नांमध्ये यश मिळाले. अक्षयला या कामामध्ये ट्विंकल खन्नाने देखील मदत केली होती. २५ वर्षांनंतर राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया पुन्हा एकदा एकत्र आले होते. जावई अक्षयमूळे त्यांनी एकत्र राहायला सुरुवात केली होती.

अक्षयने राजेश खन्नाला सांगितले होते की, ‘आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या आयूष्यात जेवढ्या चुका केल्या त्या सगळ्या विसरुन जा आणि शेवटचे दिवस एन्जॉय करा. तुमच्या शेवटच्या दिवसांमध्ये तुमच्या जवळच्या माणसांमध्ये राहयला हवे’. त्याचे हे बोलणे ऐकून त्यांनी पत्नी डिंपलसोबत राहण्याचा निर्णय घेतला. शेवटच्या क्षणापर्यंत ते आपल्या कुटूंबासोबत राहिले.

जवळजवळ २५ वर्षांनंतर दोघांनी परत एकदा एकत्र राहायला सुरुवात केली. त्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत दोघे एकत्र राहत होते. जुलै २०१२ मध्ये राजेश खन्ना हे जग सोडून गेले. त्यांच्या जाण्याने डिंपलला खुप मोठा धक्का बसला होता. शेवटच्या दिवसांमध्ये त्या राजेश खन्नासोबत होत्या. याचा त्यांना आनंद देखील आहे.

महत्वाच्या बातम्या –

संजू बाबाला किस करायला घाबरत होती बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री; मग वडीलांनी दिली ट्रेनिंग

जाणून घ्या आज काय करतात अभिनेते विनोद मेहराची मुलं?

नशेत धुंद धर्मेंद्रने मंत्र्याच्या पत्नीला केले होते जबरदस्ती किस; झाला होता मोठा तमाशा

प्रियंका चोप्राने ट्रान्सपरंट ड्रेस घालून उडवली चाहत्यांची झोप; पहा फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.