आमिर खानने दिव्या भारतीसोबत केलेल्या ‘त्या’ कृत्यामुळे घाबरलेली दिव्या तासंतास बाथरूममध्ये रडत बसली होती

बॉलीवूडमध्ये ९० च्या दशकात खान्सचा खुप दबदबा होता. आजही तो दबदबा कायम आहे. बॉलीवूड काम करणारा प्रयत्न कलाकार अमीर खान, शाहरुख खान आणि सलमान खानचा आदर करतो. त्यासोबतच अनेकदा बॉलीवूडमध्ये नवीन येणारे कलाकार या खान्सला घाबरतात.

त्यामुळे फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेकदा या गोष्टीवरून कलाकारांमध्ये वाद देखील होतात. तर काही कलाकार वाद न घालता एकटे रडत बसतात. असेच काही अभिनेत्री दिव्या भारतीसोबत झाले होते. ज्यामुळे ती बाथरूममध्ये तासंतास रडत बसली होती.

हा किस्सा आहे ९० च्या दशकातच्या सुरुवातीचा. त्यावेळी दिव्या भारती बॉलीवूडमध्ये नवीन होती. तिने कमी चित्रपटांमध्ये काम केले होते. पण ते सर्व चित्रपट हिट झाले होते. त्यामुळे ती खुप प्रसिद्ध होती. तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या.

त्यासोबतच ती अनेक कार्यक्रमांमध्ये देखील भाग घेत होती. अशाच एका कार्यक्रमा वेळी आमिर खानने दिव्या भारतीला रडवले होते. ती खुप वेळ होती. त्यावेळी सलमान खानने दिव्याची मदत केली आणि तिला रडण्यापासून थांबवले.

याबद्दल बोलताना दिव्या भारती म्हणाली की, ‘लाईव्ह कार्यक्रम सुरू असतील तर सगळ्यांकडून अनेक चुका होतात. माझ्याकडून देखील अशीच एक छोटी चुक झाली होती. ती चुक झाल्यानंतर मी लगेचच ती चुक सुधारली होती. कोणालाही माझी चुक लक्षात आली नव्हती. फक्त आमिर खानला माझी चुक समजली होती.

म्हणून आमिर माझ्यावर चिडला. माझा परफॉर्मन्स झाल्यानंतर तो मला म्हणाला की, ‘तुझ्या नृत्य दिग्दर्शकासोबत मला पण सराव करायचा आहे. कारण तु एकही स्टेप नीट केली नाही. तुझं लक्ष नव्हते. मी तुझ्यासोबत परफॉर्म नाही करू शकत.

एवढे बोलून आमिर खान निघून गेला. पण त्याचे हे बोलणे माझ्या मनाला खुप लागले. मी बाथरूममध्ये जाऊन अनेक तास रडत होते. एवढेच नाही तर आमिरने माझ्या जागी जुही चावलासोबत परफॉर्मन्स केला. ही गोष्ट मला आवडली नाही. मी अजून रडत बसले.

त्यावेळी सलमान खान तिथे आला आणि त्याने माझी मदत केली. सलमान खुप दमलेला होता. पण तरीही त्याने माझ्यासोबत परफॉर्म केले. मला त्याचा स्वभाव खुप आवडला. आमिर खानला माझा राग मानू नये. पण मी त्याला म्हणेल की, आमिरने सुपरस्टार सारखे वागू नये. एखाद्या सिनियरसारखे वागावे’. असे देखील ती म्हणाली.

दिव्या या मुलाखतीमध्ये बॉलीवूडचे अनेक रहस्य उघड केले होते. पण कमी वेळात दिव्याने बॉलीवूडमध्ये यश मिळवले होते. त्यापेक्षाही कमी वेळात ती हे जग सोडून गेली होती. पण तरीही प्रेक्षक तिला आजही विसरू शकले नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या –

महिमा चौधरीने सांगितले खरे कारण; म्हणाली मी बॉलीवूड सोडले नाही सोडावे लागले

‘तारक मेहता’मध्ये सोनूची भुमिका निभावणारी झील मेहता आज दिसते खुपच सुंदर; पहा फोटो

फक्त पाचशे रुपये घेऊन मुंबईला आली होती ‘ही’ अभिनेत्री आज कमावते करोडो रुपये

‘अजयचा मॅटर झालाय हा फोन येताच त्याचा बाप २०० फायटर पोरं घेऊन स्पाॅटवर पोहोचला’

गोविंदाच्या मुलीचे फोटो पाहिले का? दिसते खूपच हॉट आणि सुंदर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.