परिस्थितीला हरवत ऊसतोड कामगाराचा मुलगा डॉक्टर बनला; पण कोरोनाची लढाई हरला

परभणी | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. देशात कोरोनामुळे भीतीची परिस्थिती निर्माण झाली आहे.  कोरोनाने कुणाच्या वडिलांना हिरावले आहे. तर कुणाच्या तरूण मुलाला. तर कुणी आपल्या संपुर्ण कुटूंबाला कोरोनामुळे गमावलं आहे.

कोरोना काळात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, नर्स यांना  कोरोनाची लागण झाली आहे. देशात आजवर अनेक डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशातच परभणीमधील एका तरूण डॉक्टरचा कोरोनाने आणि म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाला आहे.

परभणीच्या पाथरी येथे आनंद नगर तांड्यावर डॉ राहूल विश्वनाथ पवार राहत होते. घरची परिस्थीती गरीबीची होती. मात्र तरीही परिस्थितीवर मात करत  राहूल पवार डॉक्टर बनले होते. आजारी असतानाही त्यांनी परिक्षा दिली होती.

ऊसतोडणीचं काम करून गरीबीची झळ लेकाला कधीही न सोसू देता विश्वनाथ पवार यांनी लेकाला डॉक्टर बनवले होते. लातूर येथे एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाची राहूलने परिक्षा दिली होती. आईवडिलांना ऊसतोडणी कामात मदत करत राहूलने शिक्षण पुर्ण केले होते.

एक महिन्यापुर्वी राहूलला कोरोनाची लागण झाली होती. तसेच म्युकरमायकोसिसचा संसर्गही झाला होता. राहूलवर औरंगाबाद येथे उपचार सुरू होते. दिवसेंदिवस राहूलची प्रकृती बिघडत चालली होती. अखेर आज राहूलची प्राणज्योत मालवली आहे.

आईवडिलांचं स्वप्न पुर्ण झालं असतानाच क्रुर कोरोनाने डॉ राहूल यांना हिरावले आहे. राहूलच्या उपचारासाठी आईवडिलांनी कर्ज काढले होते. राहूलच्या उपचारासाठी  पैशाची गरज होती.  यानंतर कॉलेज प्रशासन, मित्रमंडळी, सामाजिक कार्यकर्ते मदतीसाठी पुढे आले होते.

महत्वाच्या बातम्या-
म्हताऱ्याचा नाद नाय! रस्त्यावरुन जाता जाता घेतला तीन तरुणींचा चूम्मा, पहा व्हिडीओ
‘चला हवा येऊ द्या’ फेम भारत गणेशपुरे दुसऱ्यांदा चढले होते बोहल्यावर; दुसरी पत्नी आहे खूप सुंदर
साताऱ्याच्या ‘या’ पठ्ठ्याची मुकेश अंबानी यांना टक्कर; कारनामा बघून तुम्ही पण हैराण व्हाल
वयाच्या ७० व्या वर्षी देखील फिट राहण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी ‘हे’ काम करते रेखा

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.