सुंदर असूनही बॉलीवूडमध्ये यशस्वी होऊ शकल्या नाहीत ‘या’ अभिनेत्री

फिल्म इंडस्ट्रीमध्ये कलाकार त्यांच्या अभिनयाच्या जोरावर राज्य करत असतात. तर काही कलाकार त्यांच्या लुक्समूळे इंडस्ट्रीमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत. पण इंडस्ट्रीतील अभिनेत्र्या मात्र अभिनयासोबतच त्यांच्या सुंदरतेच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये नाव कमवतात.

बॉलीवूडमधल्या अनेक अभिनेत्र्या त्यांच्या सुंदरतेसाठी ओळखल्या जातात. तर काही अभिनेत्र्या मात्र अभिनय कौशल्यासाठी ओळखल्या जातात. म्हणूनच त्यांना बॉलीवूडमधल्या यशस्वी अभिनेत्रींमध्ये सामील केले जाते. पण काही अभिनेत्री अशाही आहेत ज्या दिसायला तर खुप सुंदर आहेत. पण त्यांना इंडस्ट्रीमध्ये हवे तसे यश मिळाले नाही. जाणून घेऊया कोण आहेत त्या अभिनेत्री.

१ प्राची देसाई – छोट्या पडद्यावरुन मोठ्या पडद्यावर प्रवेश करणारी प्राची देसाई दिसायला खुपच सुंदर आहे. तिच्या सुंदरतेमूळेच तिला मालिकांमध्ये काम मिळत होते. पण तिच्या सुंदरतेची ही जादू बॉलीवूडमध्ये चालू शकली नाही. तिला बॉलीवूडमध्ये हवे तसे यश मिळाले नाही.

प्राची देसाईने झी टिव्हीवरील कसम मालिकेत काम केले आहे. त्यानंतर तिला एकता कपूरने बॉलीवूडमध्ये लॉन्च केले. टेलिव्हिजनवर ब्यूटी क्वीन म्हणून ओळखली जाणारी प्राची मोठ्या पडद्यावर काहीही जादू करु शकली नाही. ती आजही काम मिळवण्यासाठी मेहनत करत आहे.

२ नेहा शर्मा – बॉलीवूड अभिनेत्री नेहा शर्मा दिसायला खुप सुंदर आहे. तिच्या सुंदरतेचे दिवाने सगळीकडे आहेत. नेहाने इम्रान हाश्मीसोबत क्रुक चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर तिने तुम बिन, यंगिस्तान, तुम बिन २, क्या सुपर कुल है हम यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले.

पण नेहाच्या सुंदरतेची जादू बॉलीवूडमध्ये चालू शकली नाही. तिची गिणती इंडस्ट्रीतील फ्लॉप अभिनेत्रींमध्ये केली जाते. नेहा एका राजकारणी घरातून येते. तिचे वडील अजीत शर्मा बिहारचे मोठे नेते आहेत. इंडस्ट्रीमध्ये यश मिळवण्यासाठी नाही नेहाची सुंदरता कामी आली आणि नाही तिचा परिवार. ती आजही मेहनत करत आहे.

३ यामी गौतम – टेलिव्हिजनवरुन चित्रपटांमध्ये प्रवेश केलेल्या यामी गौतमच्या नावाचा देखील या यादीत समावेश होतो. यामी सुंदरतेच्या बाबतीत बॉलीवूडमधल्या मोठ्या मोठ्या अभिनेत्रींना टक्कर देते. पण तिची सुंदरता तिला बॉलीवूडमध्ये यश मिळवून देऊ शकली नाही.

महत्वाच्या बातम्या –
कंगणा राणावतचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्रीला झाला आनंद; म्हणाली…
बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने सख्या भावासोबत केला होता फिल्मी पडद्यावर रोमान्स; लोकांनी दिल्या शिव्या
बॉलीवूडच्या प्रसिद्ध गायकांनी केले आहेत दोन लग्न; जाणून घ्या कोण कोण आहे या यादीत?
‘तारक मेहता..’ मालिकेत दयाबेन कधी येणार? निर्माते असीम मोदींनी स्पष्टच सांगीतलं..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.