अरे कुठं फेडताल ही पापं! या जगात माणुसकी शिल्लक आहे का? हत्तीला निर्दयीपणे मारहाण

मुंबई : माणसाने माणूसकीच्या नात्याने अनेक गोष्टी जपायला हव्या. पण इथे तर माणूसकीच हरवली आहे. कारण माणसांच्या क्रूरतेच्या घटनांनी हद्दच पार केली आहे. तामिळनाडूच्या कोयंबटूर येथून ५० किमी अंतरावर ठेक्कमपट्टी येथे असलेल्या एका कॅम्पमध्ये ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.

सध्या सोशल मिडीयावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे. या व्हिडीओमध्ये दोन माणसं एका हत्तीला अमानुषपणे काठ्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. या हत्तीला एका झाडाला बांधलं आहे. मार सहन करणारा हत्ती मोठमोठ्याने व्हिव्हळत आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ शेअर करताना माणूसकीला काळीमा फासल्याच्या भावना लोक व्यक्त करत आहेत. ज्या माथेफीरुंनी हा प्रकार केला आहे त्यांच्या विरोधात सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे.

याआधीही घडल्या अशाच घटना…
काही दिवसांपूर्वीच तमिळनाडुच्या निलगिरी भागातून एक धक्कादायक घटना समोर आली होती. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेत विकृताने पेटता टायर हत्तीच्या डोक्यावर फेकला होता. तो टायर हत्तीच्या कानात अडकला आणि या टायरच्या आगीमुळे त्याचा मृत्यू झाला होता.

गेल्यावर्षी काही नराधमांनी एका गरोदर हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं अननस खाण्यास दिल्याची घटना समोर आली होती. हत्तीणीने ते अननस खात असताना त्याचा स्फोट झाला आणि त्यामध्ये हत्तीणी मेली. हत्तीणीसोबत तिच्या पोटातील बाळही मेलं. या घटनेत हत्तीणी प्रचंड रक्तबंबाळ झाली होती. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती.

महत्त्वाच्या बातम्या 

संजय राठोडांसाठीचा ‘तो’ मेसेज होतोय व्हायरल; वाचा नेमकं काय त्या मेसेजमध्ये
शालूचा इश्किया अंदाज एकदा पाहाच; सोशल मीडियावर व्हिडीओ घालतोय धुमाकूळ…
‘मोदी सरकारने डिझेलच्या करातून २१ लाख कोटी कमावले’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.