संतापजनक! मंदिरात पाणी पिण्यासाठी आलेल्या मुस्लिम मुलाला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश | मंदिरात पाणी पिण्यासाठी आलेल्या एका मुलाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. हा संतापजनक प्रकार उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे आरोपीनेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा मारहाण करतानाचा व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घेत गाझियाबाद पोलिसांनी श्रृंगी नंदन यादव या आरोपीला अटक केली आहे.

व्हिडीओमध्ये आरोपी श्रृंगी यादव एका मुलाला त्याचं आणि वडिलांचं नाव विचारताना दिसत आहे. यावर तो मुलगा नाव सांगतो. नावावरून तो मुस्लिम असल्याचं लक्षात येते. यानंतर तु मंदिरात प्रवेश केलास कसा? असा विचारत आरोपीने मुलाला बेदम मारहाण केली आहे.

तसेच व्हिडीओमध्ये मुलगा आपण पाणी पिण्यासाठी आलो असल्याचे वारंवार सांगतो. मारू नका अशी विनंती करतो मात्र आरोपी मुलाला लाथा-बुक्क्यांचा मार थांबवत नाही. व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.

महत्वाच्या बातम्या-
इशान किशनची गर्लफ्रेंड आहे मॉडेल, हॉट फोटोंचा सोशल मिडीयावर धुराळा
अभिनेत्री परिणीती चोप्रा झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या पाठिशी, म्हणाली…
वाझेंना अटक करुन महाराष्ट्र पोलीस दलाचा अपमान केला; सेनेचा ढाण्या वाघ कडाडला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.