जंगलातून जात होता दुचाकीवर समोर आली तीन अस्वल, पुढे काय झाले पाहा व्हिडिओ….

आजकाल सोशल मीडियाद्वारे अनेक वेगवेगळे व्हिडीओ समोर येत असतात. काही व्हिडीओ हे प्रेरणा देणारे असतात, तर काही व्हिडीओ थरारक असतात. सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडीओ देखील फार प्रमाणत पाहिले जातात आणि त्याला लाईक देखील भरपूर प्रमाणात भेटतात.

त्याचप्रमाणे सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हिडीओ ही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. काही प्राण्यांचे व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ हैराण करणारे असतात. असाच काहीचा व्हिडीओ प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे.

जंगलातून जाताना दुचाकीसमोर तीन अस्वल आल्यावर काय होते, हे दाखवणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर भरपूर प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडीओवर सतत कमेंट्स करत आहेत. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती बाईकने जंगलातून जात असतो आणि अचानक त्याला काही अंतरावर तीन अस्वल दिसतात.

अस्वलांना पाहून तो आपली बाईक थांबवतो आणि तिन्ही अस्वलांना पाहत राहतो. त्याने राईड़ करताना कॅमेरा सुरु ठेवल्याने हे सर्व व्हिडीओत कैद होत असते. तेवढ्यात तिघांतील एक अस्वल अचानक त्या व्यक्तीकडे पळत येऊ लागते. त्यामुळे तो व्यक्ती प्रचंड घाबरतो आणि पळायला लागतो.

व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्याला समजते की, या व्यक्तीबरोबर काहीही अघटीत घडू शकले असते. असंच काहीसे कॅप्शन देत आनंद महिद्रा यांनीही लिहिले आहे की, ‘तुम्हाला रोमहर्षक व्हिडीओ पाहायचा असल्यास हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा.

तसेच बाईकमध्ये ‘Bear Charge’ अशी वॉर्निंगही हवी अशी मेजशीर कॅप्शन दिली आहे. नेटकरी देखील या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट करत आहेत. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, कुठेपण जाताना सावधगिरी बाळगा असे म्हटले जात आहे.

ताज्या बातम्या

VIDEO: दागिन्यांच्या दुकानामध्ये महिलांचा प्रताप; अशी चोरी केली की सर्वच झाले हैराण

मोठी बातमी! राखी सावंतकडून झाली मोठी चुक, बोलता बोलता सांगितले खतरों के खिलाडीच्या विजेत्याचे नाव

VIDEO: नितीन गडकरींचा ताफा पुढे जाताच मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा अधिकारी अन् एसपींमध्ये हाणामारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.