आधार कार्ड अपडेटच्या नावाखाली होतेय फसवणूक, खोट्या वेबसाईटपासून राहा सावध अन्यथा…

मुंबई | आजच्या काळात आधार कार्ड खूप गरजेचे आहे. आपण कोणत्या देशाचे नागरिक आहोत यासाठी प्रत्येक माणसाकडे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. याचबरोबर आपल्याला नवीन सिम कार्ड घेण्यापासून ते बँकेत आपले अकाऊंट उघडण्यापर्यंत सगळीकडे आधारकार्डची गरज असते.

याच आधार कार्डमध्ये एखादी चुक झाली तर अनेकदा त्यातील दुरुस्ती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याचबरोबर अनेक किचकट अटींमुळे आधार कार्डमधील दुरुस्तीसाठी अनेक वेळ देखील आपला खर्च होतो.  मात्र अनेकदा जन्मतारीख, पत्ता अथवा काहीतरी चूक असल्यास ते अपडेट करणं अत्यंत गरजेचे आहे.

परंतु, याचाच फायदा काही फसवणूक करणाऱ्यांकडून घेतला जातो. आधार कार्ड अपडेट किंवा काही करेक्शन करायच्या नावाखील अनेकांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहेत. त्यामुळे आधार कार्डमध्ये बदल करताना काळजी घेणं गरजेचं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आधार अपडेटच्या नावाखाली काही खोट्या वेबसाईट्सद्वारे लोकांची फसवणूक केली जात आहे. या वेबसाईट्सवरही कॉमन सर्विस सेंटरवर केल्या जाणाऱ्या प्रोसेसप्रमाणेच काम होत. युजर्सची फसवणूक करण्यासाठीच खोट्या वेबसाईट कॉमन सर्विस सेंटरप्रमाणे काम करतात. यामुळे अशा बनावट वेबसाईट्सपासून अत्यंत सावध राहा.

जाणून घ्या आधार कार्ड अपडेट करण्याची योग्य पद्धत..
आधार कार्डवर कोणतीही माहिती अपडेट करायची असल्याची किंवा इतर माहितीसाठी, आधार कार्डच्या अधिकृत वेबसाईटवर जा.  WWW.UIDAI.IN ही अधिकृत वेबसाईट असून या ठिकाणी आधार कार्डबाबत सर्व माहिती मिळू शकेल. UIDAI च्या वेबसाईटवर काही कॉमन सर्विस सेंटरची नावं देण्यात आली आहेत. त्या सेंटरवर जाऊन आधार कार्ड अपडेट करता येते.

महत्त्वाच्या बातम्या
गृहिणींसाठी कामाची बातमी! धान्याला किड लागू नये यासाठी करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय  
सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये उडाली खळबळ! निवृत्तीचे वय ३० वर्षे की वयाची ५० वर्षे निर्णयासाठी समिती
‘आयुष्यभराच्या प्रेमावर शिक्कामोर्तब’; पहा वरुण धवनच्या लग्नाचे सुंदर फोटो…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.