बीसीजीची लस कोरोनावर ठरतेय चांगलीच परिणामकारक; मुंबईच्या संशोधकांची माहिती

मुंबई | देशभरात कोरोना विषाणूचा हाहाकार सुरु आहे. एकीकडे रुग्णांच्या संख्येत वाढ होतं आहे. तर दुसरीकडे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण देखील वाढतं आहे. याचबरोबर कोरोना विषाणूवरील लस शोधण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहे. अशातच एका संशोधनातून दिलासादायक माहिती समोर आली आहे.

अनेक दशकांपासून क्षयरोग प्रतिबंधक म्हणून लहान मुलांना देण्यात येणारी बीसीजीची लस कोरोनाच्या रुग्णांवर परिणामकारक असल्याची माहिती समोर आली आहे. परेलच्या हाफकिन रिसर्च इन्स्टिट्यूट आणि पुण्याच्या बी. जे. मेडिकल महाविद्यालयातील संशोधकांच्या गटाने यासंदर्भात संशोधन केले.

कोविडच्या रुग्णाला श्वसनाला अडचण येत असेल तर त्यावर बीसीजी लसीचा वापर करता येऊ शकेल, असे या संशोधनातून समोर आले आहे. याचबरोबर बीसीजी लसीचा डोस कोरोनाच्या रुग्णाला दिला असता त्याची श्वसनाची अडचण दूर होतं असल्याचे देखील समजले आहे.

दरम्यान, या संशोधनासाठी ६० अशा कोरोना रुग्णांना बीसीजी लस देण्यात आली आहे.  ज्यांना न्यूमोनिया आणि श्वसनाचा त्रास होत होता. त्यापैकी अर्ध्या रुग्णांची श्वसनाची समस्या तीन ते चार दिवसांत कमी झाली आहे. विशेष बाब म्हणजे या रुग्णांपैकी कुणाच्याही मृत्यूची नोंद झाली नाही.

देशात गेल्या २४ तासांत वाढले करोनाचे ५०,२०९ नवे रुग्ण, तर ७०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या बरोबर देशात एकूण करोबाधितांची संख्या पोहोचली ८३,६४,०८६ वर पोहचली आहे. काल राज्यात ११,२७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच राज्यात आजपर्यंत एकूण १५,५१,२८२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या
‘या’ वेबसाईटवर १ रुपयाची नोट लाखोंच्या किंमतीने विकली जाते, जाणून घ्या कशी विकायची?
पुनम पांडेने धरणावर विवस्र व्हिडीओ शुट केल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
किंचाळणाऱ्या बोक्याला पिंजऱ्यात टाकले, म्हणत बड्या बाॅलीवूड दिग्दर्शकाने केले ठाकरेंचे कौतूक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.