श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान न मिळाल्याने विकेटकिपर वृद्धिमान साहाने संताप व्यक्त केला होता. त्याने भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर टीका केली होती. आता या वक्तव्यामुळे रिद्धिमान साहा वादात सापडला आहे.(bcci take action on vridhimaan saha)
केंद्रीय कराराच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपांवर आता बीसीसीआय भारतीय संघाचा विकेटकिपर वृद्धिमान साहाला कारणे दाखवा नोटीस बजावू शकते. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान न मिळाल्याने वृद्धिमान साहा नाराज झाला होता. त्यानंतर त्याने भारतीय संघाचे राहुल प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याबाबत वक्तव्य केलं होत.
राहुल द्रविड यांनी मला निवृत होण्याचा सल्ला दिला होता, असा खुलासा वृद्धिमान साहाने केला होता. यावेळी त्याने बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर देखील टीका केली होती. यामुळे आता वृद्धिमान साहा अडचणीत सापडला आहे. वास्तविक, केंद्रीय कराराशी संबंधित भारतीय खेळाडूंना संघ निवडीपासून इतर अनेक गुपिते सार्वजनिक मंचावर उघड करण्यास मनाई आहे.
परंतु वृद्धिमान साहाने भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यासोबत झालेले संघ निवडीबाबतचे संभाषण समाज माध्यमांसमोर उघड केले. त्यामुळे हा वाद आणखीनच चिघळला आहे. या प्रकरणात वृद्धिमान साहाने केंद्रीय कराराच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे बीसीसीआय कारणे दाखवा नोटीस बजावण्याची शक्यता आहे.
भारतीय विकेटकिपर वृद्धिमान साहाने केंद्रीय करारातील नियम ६.३ चे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. या नियमानुसार, “कोणत्याही खेळाडूने खेळ, अधिकारी, खेळातील घडामोडी, तंत्रज्ञानाचा वापर, निवडीच्या बाबी किंवा खेळाशी संबंधित इतर कोणत्याही विषयाबाबत कोणत्याही प्रकारच्या समाज माध्यमांवर कोणतीही टिप्पणी करू नये. बीसीसीआयच्या मते असे करणे खेळ, भारतीय संघाच्या किंवा बीसीसीआयच्या हिताचे नाही.”
बीसीसीआयचे सदस्य अरुण धुमाळ यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, “या प्रकरणाबाबत बीसीसीआय साहा यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. बीसीसीआय अध्यक्षांनी त्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतरही साहाने द्रविडसोबत झालेली चर्चा सार्वजनिक का केली? हा प्रश्न बीसीसीआय त्यांना विचारू शकते.”
महत्वाच्या बातम्या :-
अखेर शालिनी हत्या प्रकरणाचा झाला उलगडा, प्रियकरानेच केली होती हत्या, कारण ऐकून पोलिसही चक्रावले
नोकरी सोडा अन् 25 हजारात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, महिन्याला 3 लाखांपर्यंत होईल कमाई; सरकार देतंय 50% अनुदान
मित्रांनी आधी दारू पाजली मग.., खेड घाटात झालेल्या तरुणाच्या हत्येचे गूढ उकलले, वाचून धक्का बसेल