T20 World Cup : सध्या टी-२० विश्वचषक २०२२ ऑस्ट्रेलियात खेळला जात आहे आणि आता यानंतर पुढील टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये खेळला जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ निवड समितीने सोमवारी न्यूझीलंड आणि बांगलादेश दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली आहे.
याविषयी बोलताना मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या भविष्यावरही चर्चा झाली. टी-२० विश्वचषक २०२२ नंतर टीम इंडियाला न्यूझीलंड दौऱ्यावर टी-२० आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची आहे. त्यानंतर एकदिवसीय आणि कसोटी मालिका बांग्लादेशमध्ये खेळायची आहे.
चेतन शर्मा यांना एका पत्रकाराने रोहित शर्मा आणि विराट कोहली हे २०२४ च्या टी-२० विश्वचषकाचा भाग असेल का? असे विचारले. तेव्हा वर्कलोड मॅनेजमेंटमुळे त्यांना विश्रांती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनतर या दोन्ही खेळाडूंच्या भविष्याबद्दल त्यांना विचारले.
यावर चेतन शर्मा म्हणाले की, ‘याविषयी टूर्नामेंटच्या मध्येच कसं बोलू शकतो. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही मोठे खेळाडू आहेत. त्यांना काही वाटले तर ते स्वतः येऊन आमच्याशी बोलतील, असे ते म्हणाले.
चेतन शर्मा यांनी सांगितले की, कोणत्याही खेळाडूने विश्रांती घेतली नाही. त्यांनी सांगितले की बीसीसीआयची निवड समिती, संघ व्यवस्थापन आणि वैद्यकीय संघ एकत्र काम करतात आणि खेळाडूंच्या फिटनेस आणि कौशल्यानुसार, त्यांनी कधी विश्रांती घ्यावी आणि कधी खेळावे याची निवड केली जाते.
ते पुढे म्हणाले की, आमच्यासाठी कसोटी सामना ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यासाठी आमचे खेळाडू खूप फ्रेश असावेत, त्यामुळे त्यांना योग्यवेळी विश्रांती देणे खूप महत्त्वाचे आहे. सध्या विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही २०२२ चा टी-२० विश्वचषक खेळत आहेत. आतापर्यंत टीम इंडियाने २०२२ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत तीन पैकी दोन सामने जिंकले आहेत.
महत्वाच्या बातम्या
‘मला वेड्यात काढू शकता पण देवाला नाही’, BCCI ने वारंवार दुर्लक्ष केल्याने खेळाडू संतापला
Jasprit Bumrah: पुन्हा दिसणार बुम बुम बुमराहचा जलवा, ‘या’ दिवशी गाजवणार मैदान, समोर आली मोठी अपडेट
World Cup: पंत की कार्तिक, उद्या बांग्लादेशविरूद्ध कोण खेळणार? राहुल द्रविडच्या उत्तराने सगळेच झाले अवाक
BCCI च्या राजकारणामुळे उद्ध्वस्त झाली २२ वर्षाच्या स्टार खेळाडूची कारकिर्द, संघातून झाली हकालपट्टी