Mulukh Maidan
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • बाॅलीवुड
  • राज्य
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • बाॅलीवुड
  • राज्य
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य
  • इतर
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

bcci : थेट आयपीएल खेळण्याच्या तयारीत जसप्रीत होता बुमराह; BCCI ने घेतला मोठा निर्णय 

Mayur Sarode by Mayur Sarode
January 6, 2023
in ताज्या बातम्या, खेळ
0
jasprit bumrah bcci

bcci selected japreet bumrah in indian team  | नववर्ष सुरु होताच भारतीय संघासाठी आणि क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा सामना विजेता खेळाडू जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बराच काळ बाहेर होता. तो आता पुन्हा भारतीय संघात परतणार आहे.

बीसीसीआयने भारत श्रीलंका यांच्यात होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत त्याची भारतीय संघात निवड केली आहे. म्हणजेच १० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत बुमराह भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना दिसणार आहे.

बुमराह आयपीएलपर्यंत दुरुस्त होऊन तो थेट आता आयपीएल खेळेल असे म्हटले जात होते. असे असतानाच बुमराहला अचानक श्रीलंका दौऱ्यासाठी संघात निवडण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. याचे कारणही आता समोर आले आहे.

सध्या टीम इंडियाचा सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आशिया चषकापूर्वीपासून संघाबाहेर आहे. आशिया चषकानंतर त्याचे संघात पुनरागमनही झाले, मात्र केवळ दोनच सामने खेळल्यानंतर पुन्हा त्याच्या पाठीचे दुखणे वाढले. त्यामुळे त्याला संघाबाहेर व्हावे लागले. टी २० वर्ल्ड खेळण्याची संधीही त्याला मिळाली नाही.

अशात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याची फिटनेस चाचणी झाली आहे. ती चाचणी तो उत्तीर्ण झाल्यापासून त्याचे भारतीय संघात पुनरागन होईल, अशी चर्चा होती. पण तो आयपीएलमध्येच आता दिसून असे म्हटले जात होते. पण बीसीसीआयने त्याची अचानक श्रीलंकेच्या दौऱ्यावर निवड केली आहे.

२०२२ हे वर्ष टीम इंडियासाठी खूप वाईट होते. आशिया कपमधील पराभवानंतर टी २० वर्ल्डकपमध्येही सेमी फायनलमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या खराब कामगिरीनंतर बोर्ड आगामी २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाबाबत चिंतेत आहे.

अशा परिस्थितीत विश्वचषकाच्या तयारीसाठी जसप्रीत बुमराहचे संघात पुनरागमन करण्यात आले आहे. त्याच्या पुनरागमनानंतर, बुमराह काही सामन्यांमध्ये आपली तंदुरुस्ती सिद्ध करताना दिसणार आहे. विश्वचषकापूर्वी तो या सामन्यांद्वारे आपला जुना फॉर्म परत मिळवण्याचा प्रयत्न करेल.

टीम इंडियाचा श्रीलंकेविरुद्धचा एकदिवसीय संघ-
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.

महत्वाच्या बातम्या-
देश सोडून चाललाय ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता, भारतातले सगळे व्यवसाय केले बंद, मालमत्ताही विकल्या
मुलीच्या मृत्यूचा आईला बसला जबर धक्का, एकाच दिवसाने आईनेही सोडले प्राण; हृदय पिळवटून टाकणारी घटना…
उर्फीने पुन्हा चित्रा वाघ यांना डिवचलं, भगवा ड्रेस घालून केलं असं काही की.., पहा व्हिडीओ 

Tags: cricektIndian Teamjaspreet bumrahक्रिकेटजसप्रीत बुमराहभारतीय संघ
Previous Post

मलायका तिच्या चंचल मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही? एक्स-हसबैंडसोबत रात्री उशिरापर्यंत….

Next Post

क्रेटाच्या किंमतीत मिळत आहेत BMW च्या लक्झरी कार; रोड टॅक्स भरण्याचेही काही झंझट नाही

Next Post

क्रेटाच्या किंमतीत मिळत आहेत BMW च्या लक्झरी कार; रोड टॅक्स भरण्याचेही काही झंझट नाही

ताज्या बातम्या

mahrashtra rainfall 2

राज्यात आणखी किती दिवस अन् कोणत्या भागात पाऊस पडणार? हवामान खात्याने दिली महत्वाची माहिती

March 21, 2023

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेविरोधात भाजप आणि ठाकरे गटाची युती; जाणून घ्या नेमकं काय घडलं..

March 21, 2023

विराट-अनुष्का बागेश्वरधामच्या धीरेंद्रशास्रींच्या चरणी नतमस्तक? वाचा व्हायरल व्हिडिओ मागचे सत्य

March 21, 2023
udhav thackeray

उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या ‘या’ ४ सहकाऱ्यांच्या विरोधातच रचले कारस्थान; नावे वाचून धक्का बसेल

March 21, 2023
Eknath Shinde

शिंदेंनी असं काय केलं की १८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी एका क्षणात मागे घेतला संप? वाचा इनसाईड स्टोरी..

March 21, 2023

तरुण सतत शेजाऱ्याच्या पत्नीसोबत बोलायचा, नवऱ्याने अशी शिक्षा दिली की कुणाला सांगताच येणार नाही

March 21, 2023
  • Home
  • Privacy Policy
  • प्रसिद्ध अभिनेत्रीला आला कार्डीअक अरेस्ट, गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल, आता व्हेंटीलेटरवर..

© 2022. Website Design : Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • बाॅलीवुड
  • राज्य
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य
  • इतर

© 2022. Website Design : Tech Drift Solutions.

WhatsApp Group