रवी शास्त्री, विराट कोहलीवर बीसीसीआय नाराज, कारवाई होण्याची शक्यता, काय आहे प्रकरण, वाचा..

भारताने रविवारी इंग्लंडविरुद्ध चौथी कसोटी १५७ धावांनी जिंकली. टीम इंडियासमोर इंग्लंडचा संघ गारद झाला. यामुळे टीम इंडियाचे कौतुक केले जात आहे. असे असताना मात्र या दमदार विजयानंतर एक बातमी समोर आली आहे, ज्यात असे म्हटले आहे की बीसीसीआय कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर नाराज आहे. यामुळे चर्चा सुरू झाली आहे.

बीसीसीआय विराट कोहली आणि रवी शास्त्री गेल्या आठवड्यात लंडनमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहिल्याने नाराज आहे. वृत्त आहे की, मंगळवारी टीम इंडियाचे प्रशिक्षक शास्त्री, कर्णधार कोहली आणि इतर अनेक सदस्य एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला आले होते. जिथे पुस्तकाचे लोकार्पण होते, संपूर्ण हॉल लोकांनी भरलेला होता.

या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ५ दिवसांनी रविवारी रवि शास्त्री यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्याच्या संपर्कामुळे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर आणि फिजिओ नितीन पटेल हे सर्व पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या चौघांनाही
आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, रवी शास्त्री आणि विराट कोहली यांना मंडळाने त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची परवानगी दिली नव्हती. बीसीसीआयच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने टीओआयला सांगितले, “बोर्डाला त्या कार्यक्रमाचे फोटो मिळाले आहेत. आणि या प्रकरणाचा तपास चालू आहे.

या घटनेमुळे मंडळाला लाज वाटली आहे. याबाबत रवी शास्त्री आणि विराट कोहली यांना बोर्ड विचारपूस करेल. या संपूर्ण भागात टीमचे प्रशासकीय व्यवस्थापक गिरीश डोंगरे यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानेही भारतीय संघातील सदस्यांना त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू दिले नाही.

या संपूर्ण प्रकरणावर बीसीसीआय आता ईसीबीच्या संपर्कात आहे. आणि, इतर कोणतीही घटना न घडता मालिका यशस्वीपणे संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आत्ता आम्ही सर्व रवी शास्त्री यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहोत. बुधवारी होणाऱ्या टी -20 विश्वचषकाच्या निवड बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो.

ताज्या बातम्या

तापासोबत ‘हे’ लक्षण असेल तर वेळीच घ्या उपचार नाहीतर असू शकतो डेंग्युचा धोका

भारतीय संघात विराटसारखा कर्णधारच झाला नाही! ‘ही’ आकडेवारी पाहूण तुम्हीही म्हणाल खरं आहे

‘असा’ ओळखा डेंग्यु आणि सामान्य तापामध्ये फरक अन् वेळीच घ्या उपचार; वाचा सविस्तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.