४९ रनांवर आऊट केलं म्हणून संतप्त बॅट्समनने कॅच घेणाऱ्या फिल्डरला बेशुद्ध होईपर्यंत मारलं

 

क्रिकेट खेळत असताना खेळाडूंसोबत अनेक धक्कादायक घटना घडत असतात. अनेकदा खेळाडूंमध्ये हाणामारी होऊन ते एकमेकांना गंभीर जखमी सुद्धा करतात, अशीच एक धक्कादायक घटना मध्य प्रदेशच्या ग्वालीयरमध्ये घडली आहे.

ग्वालीयरमध्ये आयोजित केलेल्या एका क्रिकेट स्पर्धेत एका फलांदाजाने एका फिल्डरला मारून बेशुद्ध केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर त्या फिल्डरला तात्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आले.

गंभीर दुखापत झालेल्या व्यक्तीचे नाव सचिन पराशर असे आहे. त्याने पालिया या फलंदाजाचा झेल घेतला होता, त्यामुळे तो फलंदाज ४९ रनांवरच आऊट झाला, त्याला ५० रन करायचे असल्यामुळे त्याला खूप राग आला.

पालिया रागात सचिन जवळ आला आणि त्याने त्याच्या डोक्यात बॅट मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिथले खेळाडू धावून आले, त्याला थांबवले, पण तोपर्यंत सचिन बेशुद्ध पडला होता, ते पाहून पालिया तिथून पळून गेला आणि सचिनला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, सध्या शहर पोलीसांनी पालियावर गुन्हा नोंदवला आहे. तसेच त्याचा शोध सुरू आहे. पालियावर पोलिसांनी सचिनची हत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचा गुन्हा नोंदवला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.