…तर मुंबईतून बाहेर पडू देणार नाही, भाजप आमदाराला जीवे मारण्याची धमकी

मुंबई : बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. फेसबुक लाइव्ह वरुन त्यांना धमकी देण्यात आली आहे. नवी मुंबईच्या पनवेल याठिकाणच्या असणाऱ्या नंदू उर्फ बाबा पाटील याने ही धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. बाबा पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्या विरोधात राजकारण कराल तर मुंबईतून बाहेर पडू देणार नाही, अशी धमकी राजेंद्र राऊत यांना देण्यात आली आहे. या तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, या इसमाने राजेंद्र राऊत यांच्या समवेत नगरसेवक अमोल चव्हाण यांनाही धमकावले आहे.

याचबरोबर या तक्रारीनुसार संबंधित इसमाने बार्शीत येऊन मारण्याची धमकी दिल्याचेही म्हटले आहे. त्याने पुढे असे म्हटले आहे की, ‘मी बार्शीत येऊन नंग्या तलवारी नाचवेन. हे करताना माझ्या विरोधात कितीही पोलीस यंत्रणा लावा.

तुमच्या कार्यकर्त्यांची यंत्रणा लावा तरी माझ्यावर परिणाम होणार नाही.’ राऊत यांनी बरोबर १० पोलीस ठेवले तरी त्याच्यावर काही परिणाम होणार नाही, असे म्हणत त्याने तलवारीने मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी बार्शी पोलीस ठाण्यात भादवि कलम 507 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

पुजा चव्हाण लॅपटॉपबाबत भाजप नगरसेवकाचा धक्कादायक खुलासा, म्हणाले लॅपटॉप माझ्याकडे…

“मी सुशांतला अनेकदा मरताना पाहिलं आहे”, सुशांतच्या आठवणीत अभिनेता झाला भावुक

कपूर घराण्यात सनई चौघडे! श्रद्धा लवकरच अडकणार लग्नबेडीत, मुलाच्या घरून आला होकार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.