मोठी बातमी! पुण्यात मिनी लॉकडाउन; बार, हॉटेल आणि रेस्टॉरंटसह पीएमपीएल बससेवा सात दिवसांसाठी बंद राहणार

मुंबई : पुण्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यात पुन्हा निर्बंध कडक करण्यात आले आहे. हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट पुढील सात दिवसांसाठी बंद राहतील. मात्र होम डिलीव्हरी सुरू राहील. मॉल आणि थिएटर्स देखील सात दिवसांसाठी बंद राहतील.

पुण्यातील करोनास्थितीची आढावा बैठक पार पडल्यानंतर आज पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकारपरिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. यावेळी आयुक्त सौरभ राव यांनी पुण्यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असल्याची देखील त्यांनी माहिती दिली.

वाचा संपूर्ण नियमावली…
अंत्यविधीसाठी केवळ २० जणांना परवानगी असणार आहे. इतर सामाजिक कार्यक्रमांवर आठवडाभरासाठी बंदी असणार आहे. संचारबंदी काळात केवळ अत्यावश्यक सुविधा सुरू राहणार आहेत.

अगोदर ठरलेल्या विवाहसमारंभासाठी केवळ ५० जणांना परवानगी असणार आहे. सर्व धार्मिक स्थळं, मॉल, थिएटर्स बंद असणार आहेत. अशी देखील माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

मंडई आणि मार्केट यार्ड सुरू राहणार आहे. पण अंतर ठेवून खरेदी करावी लागणार आहे. गार्डन आणि जिम सकाळच्या वेळेत सुरू राहणार आहे. शाळा, महाविद्यालयं ३० एप्रिल पर्यंत बंद असणार आहेत. तर, यामध्ये इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे नियोजन सुरू आहे.

स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांटी गैरसोय होऊ देणार नसल्याचेही आयुक्तांनी यावेळी सांगितले. आता पुढील आठवडयात म्हणजे शुक्रवारी निर्बंधांचा फेरआढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

आनंद महिंद्रांनी नटराजनला दिलेला शब्द पाळला; केली शानदार महींद्रा थार गिफ्ट

पुण्यात लॉकडाऊन की कडक निर्बंध? अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक

भाजप उमेदवाराच्या गाडीत सापडले ईव्हीएम; निवडणूक आयोगावर देशभरातून टिकेचा भडीमार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.