लॉकडाऊनमध्ये पठ्ठ्याचा भन्नाट जुगाड, शेतातूनच काढली वरात; पहा भन्नाट व्हिडिओ

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे देशातील काही राज्यात कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर काही राज्यात कडक निर्बंध लादण्यात आले आहे. अशात लग्न सोहळ्यासाठी काही गाईडलाईन्स आखण्यात आल्या आहे.

असे असताना लग्नासाठी एका माणसाने भन्नाट जुगाड केला आहे. त्याच्या जुगाडाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचे हसून हसून पोट दुखेल.

एकीकडे कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे अनेक लोकांना गाईडलाईन्समुळे लग्न करण्यास अडचणी येत आहे. तर दुसरीकडे या नवरदेवाने सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वळवले आहे. या व्हिडिओमध्ये नवरदेव आपली वरात थेट शेतातून काढताना दिसत आहे. त्यामध्ये तो बँडवाल्या लोकांसोबत नाचतानाही दिसत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ एका वरातीचा आहे. सध्या वरात काढण्यास परवानगी नसल्यामुळे एका नवरदेवाने आपली वरात चक्क एका शेतातूनच काढली आहे.

हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. तसेच त्यांनी कॅप्शनमध्ये मजेदार वरात असे लिहिले आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतात, की बँडवाल्यांसोबत नवरदेव येत आहे. तसेच नवरदेवासोबत काही लहान मुले आणि महिलाही आहे. तर बँडवाले वरातीत बँड वाजवत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ खुप व्हायरल होत आहे. या व्हिडिओला ३१ हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे, तर ३ हजार लोकांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे. या व्हिडिओवर काही लोकांनी भन्नाट कमेंटही केल्या आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘बाबूजी जरा धीरे चलो’ म्हणत रातोरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री, या कारणामुळे झाली बॉलीवूड मधून गायब
ट्रेनमधील लोकांच प्रेम पाहून भारावले भाऊ कदम आणि कुशल बद्रिके; वाचा पूर्ण किस्सा
हॅकिंगच्या जोरावर या मुलाने उभी केली करोडो रूपयांची कंपनी, एकेकाळी आठवीला झाला होता नापास

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.