ही तर सैतानाचा अवतार, म्हणत महिलेला नग्न करुन बळी देण्याचा प्रयत्न; बारामतीतील धक्कादायक घटना

देशभरात अनेक धक्कादायक घटना घडत आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाऱ्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळे महिला सुक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे असतानाचा आता बारामतीमधून एक हैराण करणारी घटना समोर आली. बारामतीमध्ये एका महिलेची बळी देण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.

कुटुंबातील महिला ही सैतानाचा अवतार असल्याचे समजत तिला नग्न करुन तिचा बळी देण्याचा प्रयत्न केल्याची ही धक्कादायक घटना घडली आहे. तसेच महिलेच्या कुटुंबियांनी मांत्रिकाच्या सांगण्यावरुन हा अघोरी प्रकार केला असल्याची माहिती समोर आली आहे.

बारामती तालूक्यातील करंजेपूल येथे ही घटना घडली आहे. या घटनेमुळे संपुर्ण परीसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मांत्रिकासह पाच जणांविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली आहे.

महेंद्र माणिकराव गायकवाड, राजेंद्र माणिकराव गायकवाड,कौशल्या माणिकराव गायकवाड, नीता अनिल जाधव आणि तात्या नावाचा मांत्रिक अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहे. करंजेपुल येथे राहणाऱ्या महिलेने याबाबत बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लग्न झाल्यापासून हुंडा दिला नाही म्हणून तिच्या सासरचे छळ करायचे. त्यानंतर तिला भुतबाधा झाली असे तिच्या दोन्ही दिरांनी आणि सासूने पसरवले आणि तात्या नावाच्या मांत्रिकाला बोलवले. त्यानंतर लिंबू उतरवणे, भस्म लावणे असे अनैसर्गिक कृत्य तिच्यासोबत केले गेले.

त्यानंतर हळदी कुंकवाचे रिंगण करुन त्यात महिलेला नग्न करुन बसवण्यात आले होते. यावेळी तिच्या तोंडात कापसाचा बोळा कोंबून तिला बांधून ठेवण्यात आले होते. तसेच हा प्रकार पती आणि मुलाला सांगितला तर जीव घेईल अशी धमकीही तिला देण्यात आली होती.

अशात ती जोरजोरात रडायला लागली. त्यामुळे असा आवाज ऐकून शेजारचे थोडे घाबरले. त्यानंतर त्यांनी महिलेच्या घराकडे धाव घेतली आणि तिला सोडवले. आता पीडित महिलेने सासरच्या लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्र पोलिसांनी २५ कोटींचे हेरोईन पकडले, पण ‘हिरॉईन’ नव्हती म्हणून त्यांचे कुणी कौतूक केले नाही; ठाकरेंचा भाजपला टोला
टप्पू आणि बबीताचा रोमँटीक अंदाज, दोघांच्या ‘त्या’ फोटोने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ
आर्यन नीट जेवत नाही, बॅरेकमध्ये रडत बसतो, वॉशरूमलाही जात नाही, जेल स्टाफला त्याची चिंता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.