नेतृत्व करण्यासाठी जी योग्यता लागते ती राहुल गांधींमध्ये नाही- बराक ओबामा

काँग्रेस नेते राहुल गांधी हे नेहमी चर्चेत असतात. नेहमी त्यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होत असतात. बऱ्याच विरोधी पक्षातील नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केलेली आपण पहिली आहे.

आता थेट अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी राहुल गांधी यांच्यावर विशेष टिप्पणी केली आहे. ओबामांनी नुकतेच एक पुस्तक प्रकाशित केले जे त्यांनी लिहिले आहे.

त्या पुस्तकाचे नाव आहे अ प्रॉमिस्ड लँड असे आहे. त्यात ओबामा म्हणाले आहेत की, राहुल गांधी हे एक असे विद्यार्थी आहेत ज्यांनी त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि ते शिक्षकांना इम्प्रेस करण्यासाठी सज्ज आहेत.

पण संबंधित विषयात प्राविण्य मिळवण्यासाठी त्यांना अपयश आले आहे. त्यासाठी जी चिकाटी असायला हवी ती राहुल गांधी यांच्यामध्ये नाही. त्यांनी राहुल गांधींचा उल्लेख नर्व्हस असा केला आहे. तसेच नेतृत्व करण्यासाठी जी योग्यता लागते त्याचा अभाव राहुल गांधी यांच्यात आहे.

त्यांनी या पुस्तकात फक्त राहुल गांधी नाही तर जगातील आबेक नेत्यांवर आपले विचार मांडून दाखवले आहेत. बराक ओबामा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष असताना दोन वेळा भारत दौऱ्यावर आले होते तेव्हा ते राहुल गांधी यांना भेटले होते.

२०१५ आणि २०१७ साली त्यांची भेट झाली होती. ओबामांनी मनमोहन सिंह यांच्याबद्दलही लिहिले आहे. त्यांनी मनमोहन सिंह यांचे कौतुक केले आहे. मनमोहन सिंह हे एक प्रामाणिक व्यक्तिमत्त्व आहे, असे ओबामा म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

व्यापारी आणि शेतकऱ्यांचा सर्वात मोठा दिवस म्हणजे धनत्रयोदशी; अशी करा धनत्रयोदशीची पुजा

गुड न्यूज! सीरम इन्सिट्यूटची कोरोनावरील लस अंतिम टप्प्यात; पुनावालांनी दिली महत्वाची माहिती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.