बँक ऑफ बडोदाचे १ जूनपासून ‘हा’ नियम बदलणार; ग्राहकांच्या डोक्याला वाढणार ताप

कोरोनाच्या वाढत्या काळात अत्यावश्यक सेवेमध्ये बँक सेवा पण चालू होत्या. राष्ट्रीयकृत सर्व बँकांनी या काळात पण त्यांच्या ग्राहकांसाठी सेवा उपलब्ध करून दिल्या. बँक ऑफ बडोदाने ग्राहकांसाठी नवीन अधिसूचना जाहीर केली आहे.

त्यानुसार पुढील जून महिन्यापासून चेक पेमेन्टचे नियम बँक बदलवणार असल्याची माहिती पुढे आली आहे. बँकेने या संदर्भातील माहिती त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली असल्याची माहिती मिळाली आहे.

ग्राहकांनी जर जून महिन्यापासून चेकद्वारे २ लाखांपेक्षा जास्त पेमेंट केले तर त्यांना दोनदा विचारनी केली जाणार आहे. त्यांनी जर मान्यता दिली तरच पुढील व्यवहार होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

चेक पेमेन्टच्या या नवीन नियमांमुळे ग्राहकांच्या पैशाची सुरक्षितता बँकेमार्फत जपली जाणार आहे. ग्राहक जेव्हा ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम चेकद्वारे वितरित करेल त्याची पण खातरजमा बँकेमार्फत केली जाते.

8422009988 वर ग्राहक नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, शाखा फोन किंवा एसएमएसद्वारे खात्री करून घेऊ शकतात. यासाठी लाभार्थ्याचे नाव, रक्कम (रुपयांमध्ये), धनादेशाची तारीख, रक्कम क्रमांक, खाते क्रमांक आणि धनादेश शेअर करणे आवश्यक आहे.

बँकेमार्फत हे पण सांगण्यात आले आहे की चेकद्वारे होणाऱ्या फसव्या व्यवहारांना यामुळे काही अंशी तरी आळा बसणार आहे. बँक १ जूनपासून सक्तीने या नियमाचे पालन करणार आहे. ग्राहकाने खात्री केल्याशिवाय २ लाखापेक्षा जास्तीचे व्यवहार होणार नाहीत असेही बँकेच्या वतीने सांगण्यात आलेय.

ताज्या बातम्या
महाराष्ट्र राज्यात होतोय कोरोना कमी; घ्या आजची स्थिती जाणून

टीव्ही क्षेत्रात एक अशी प्रसिद्ध मुस्लिम अभिनेत्री; जिने कधीच बिकिनी किंवा तोकडे कपडे घालून अभिनय केला नाही

तमिळनाडूच्या या पठ्ठ्याने लग्नासाठी विमानचं केलं बुक, अन् हवेतच बांधली लग्नगाठ; पाहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.