डिसेंबरमध्ये तब्बल १४ दिवस बँका बंद राहणार, जाणून घ्या ते दिवस कोणते

मुंबई | डिसेंबर महिन्यात तब्बल १४ दिवस बँका बंद राहणार आहेत. डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा महिना. या महिन्यात यंदाच्या वर्षी नाताळ सोडला तर कोणताही सण नाही. त्यामुळे जी काही बँकांची कामे आहेत ती वेळेत पूर्ण करा.

कारण राज्यांनुसार बँकांना बंद करण्यात येणार आहे. आता नवीन महिना सुरू झाल्यानंतर नवीन कामांचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यातील बँकांचे कामकाज कसे चालेल हे जाणून घ्या.

सर्वात आधी महिन्याच्या सुरुवातीला ३ डिसेंबरला बँका बंद राहणार आहेत. ३ डिसेंबरला फेस्ट ऑफ सेंट फ्रांसिस झेवियर आणि कणकदास जयंती आहे. त्यानंतर ६ डिसेंबरला रविवार असल्याने बँका बंद असणार आहेत.

यानंतर १२ डिसेंबरला दुसरा शनिवार आणि १३ डिसेंबरला पुन्हा रविवार आल्याने बँका बंद राहतील. त्यानंतर २४ आणि २५ तारखेला ख्रिसमस असल्याने बँकांचे कामकाज बंद राहील.

त्यानंतर २६ आणि २७ डिसेंबर रोजी चौथा शनिवार, रविवार असल्याने सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकांशी संबधीत सगळी काम आटपून घ्या. वेगवेगळ्या राज्यात बँकांना वेगवेगळ्या सुट्ट्या आहेत. ३१ डिसेंबरला इअर्स इन असल्यामुळे काही राज्यांत बँका बंद राहणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

प्रेमाच्या गोष्टी! अर्जुनच्या मिठीत सामावून मलायकाने केला ‘हा’ फोटो शेअर

रक्षकच झालेत भक्षक! पुण्यात पीएसआयला ५० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.