नादच! लग्नात नवरा नवरीनेच बेंजो वाजवत केला तुफान डान्स; व्हिडीओ पाहून लोटपोट व्हाल

आयुष्यातील सर्वात आनंददायी गोष्ट म्हणजे लग्न. आपल्या आयुष्याचा योग्य जोडीदार शोधून मुलगामुलगी विवाहबध्द होतात.  इथूनचं संसाराला खरी सुरूवात होते. लग्नानंतर अनेक जबाबदाऱ्या येऊन पडतात.

लग्न जमवायच्या आधी स्थळ शोधले जातात. त्यानंतर कुठून ओळख निघते का?  नातं जुळतं  का?  पाहिलं जातं. व्हॉट्स अपवर फोटो पाहिले जातात. त्यानंतर बघण्याचा कार्यक्रम होतो. मुलामुलीची पसंती, देवाण घेवाण झाली की लग्नाची तारीख काढली जाते.

लग्न जवळजवळ आल्यावर मुलाच्या आणि मुलीच्या घरच्यांची मोठी धावपळ सुरू असते. नवीन कपडे, दागदागिने, नवीन वस्तू खरेदी केल्या जातात. मुलामुलीच्या कुटूंबाकडून मानपानाला कमी केली जात नाही.

लग्नात नवरानवरीचा तर थाट असतोच. त्याचबरोबर नवरा नवरीच्या आईवडिलांचाही मोठा  थाट असतो. आपलं लग्न सगळ्यांपेक्षा वेगळं व्हावं. लग्नाची चर्चा व्हावी म्हणून अनेकजण वेगवेगळ्या तऱ्हेने लग्न करत असतात.

कुणी गोरगरीबांना मदत करून, कुणी सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करून तर कुणी साध्या पध्दतीने कमी खर्चात लग्न करून समाजापुढे वेगळा आदर्श घालून देत असतात.

तर अनेकांना वाटतं की आपलं लग्न मोठ्या थाटामाटात व्हावं. लग्नाची वरात काढली जावी. लग्नात डान्स केला पाहिजे. आता सोशल मिडिया एक असं माध्यम झालं आहे की, एखादी गोष्ट व्हायरल होण्यासाठी वेळ लागत नाही.

सोशल मिडियावर नवरा नवरीचा असाच एक बेंजो वाजवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नवरा नवरीने चक्क लग्नात पै पाहूण्यांसमोरचं बेंजो वाजवत तुफान राडा घातला आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता नवरा नवरीने मस्त पोशाख घातलेला आहे.

दोघांच्या डोक्यावर मुंडावळ्या बांधलेल्या दिसत आहेत. दोघेजण बेंजो वाजवत डान्स करत आहेत. त्यांच्या जोडीला बाकीच्या वाजंत्री मंडळींनी साथ दिली आहे. लग्नाला उपस्थित लोकांनी हा  प्रसंग मोबाईलमध्ये शुट केला आहे. सोशल मिडियावर या व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे.
महत्वाच्या बातम्या-
अक्षय कुमार होता काजोलचा पहीला क्रश; पार्टीमध्ये त्याला शोधत बसायची अभिनेत्री
गुरमीत चौधरी आणि डेबिनाचे घर आहे खुपच आलिशान आणि सुंदर; पहा फोटो
कसा काय रातोरात स्टार झाला एक साधारण जिंगल बनवणारा मुलगा, वाचा त्याची यशोगाथा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.