वर्ल्डकप सुपर लीगमध्ये बांगलादेश अव्वल स्थानी, तर भारत पाकिस्तान, अफगाणिस्तानपेक्षा खाली..

देशासह जगभरात क्रिकेटचे चाहते मोठेे आहेेेत. क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत कोणती टीम जिंकेल याचा नेम नसतो. तसेच टीमच्या रँकिंगमध्ये देखील चढ-उतार होत असतात. एखादी कमी ताकतीची टीम देखील यामध्ये अव्वल ठरते. असंच काहीच आता बघायला मिळत आहे.

वर्ल्ड कप सुपर लिगमध्ये बांगलादेशने अव्वल स्थान पटकावले आहे तर टीम इंडियाची मोठी घसरण यामध्ये झाली आहे. यामध्ये आयसीसीच्या वर्ल्डकप सुपर लीगच्या गुणतक्त्यात कमकूवत मानल्या जाणाऱ्या बांगलादेश क्रिकेट संघाने अव्वल स्थान मिळवले आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बांगलादेश ५० गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.

तसेच प्रत्येकी ४० गुणांसह तीन संघ दुसऱ्या स्थानावर आहेत. बांगलादेश संघाने त्यांनी आतापर्यंत फक्त ८ सामने खेळले असून त्यापैकी ५ मध्ये विजय मिळवला आहे. वर्ल्डकप सुपर लीगमध्ये सर्वाधिक ९ सामने इंग्लंडने खेळले आहेत. पण त्याच ५ लढतीत पराभव झाला आहे.

ही एक चांगली बाब आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने वनडे क्रिकेट अजून लोकप्रिय करण्यासाठी
वर्ल्डकप सुपर लीगची सुरूवात केली आहे. यामध्ये द्विपश्रीय वनडे मालिकांचे आयोजन वनडे वर्ल्डकप सुपर लीगच्या पद्धतीने आयोजित केले जात आहेत.

यामुळे देशांचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी गुणतक्ता देखील तयार केला जात आहे. या रँकिंगमध्ये आता बांगलादेश अव्वल, इंग्लंड दुसऱ्या, पाकिस्तान ६ पैकी ४ विजयासह तिसऱ्या, ऑस्ट्रेलिया ४० गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. पाचव्या स्थानावर न्यूझीलंड अफगाणिस्तान सहाव्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिज सातव्या तर भारत आठव्या स्थानावर आहे.

यामुळे टीम इंडिया फार खाली आली आहे. यामध्ये बांगलादेश ५० गुण इंग्लंड ४० गुण, पाकिस्तान ४० गुण, ऑस्ट्रेलिया ४० गुण, न्यूझीलंड ३० गुण, अफगाणिस्तान ३० गुण, वेस्ट इंडिज ३० गुण, भारत २९ गुण, झिम्बब्वे १० गुण, आयर्लंड १० गुण, दक्षिण आफ्रिका ९ गुण, श्रीलंका वजा २ गुण आहेत.

ताज्या बातम्या

आता टोलवर नवीन नियम, मोठी रांग झाल्यास टोल न घेताच गाडी सोडणार, जाणून घ्या..

२६ महिन्यांचा हा मुलगा असा क्रिकेट खेळतोय, विराट कोहलीही पडतोय फिका, बघा विडिओ

“पवारसाहेब तुम्ही, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांना एकत्र आणा”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.