बांगलादेशामधून(Bangladesh) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका(Dhaka) शहरातील एका हिंदू मंदिरावर हल्ला करण्यात आला आहे. गुरुवारी लाल मोहन साहा रस्त्यावरील इस्कॉन राधाकांता मंदिरावर जमावाने हल्ला केला आहे. यावेळी जमावाने मंदिराची तोडफोड करत लूटमार देखील केली आहे.(bangaldesh iskon temple attaked by people)
या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याची देखील माहिती मिळत आहे. जमावाने केलेल्या हल्ल्यात मंदिराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास २०० हुन अधिक लोकांच्या जमावाने इस्कॉन राधाकांता मंदिरावर हल्ला केला. हाजी सैफुल्ला याने या जमावाचे नेतृत्व केले होते.
या जमावाने मंदिराची तोडफोड केली. यावेळी जमावाने मंदिरातील मौल्यवान वस्तूंची लूटमार केली. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. इस्कॉन मंदिर परिसरात सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सोशल मीडियावर बांगलादेशमधील या घटनेचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत.
फोटोमध्ये इस्कॉन राधाकांता मंदिराची भिंत पडलेली दिसत आहे. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना या हल्ल्याची माहिती दिली आहे. अद्याप या प्रकरणात पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती मिळत आहे. बांगलादेशमध्ये यापूर्वी देखील हिंदू मंदिरांवर हल्ला करण्यात आला होता.
https://twitter.com/SJBarma/status/1504490205578813445?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1504493978724405255%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es2_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fnews%2Fworld%2Fbangladesh-iskcon-radhakanta-temple-in-dhaka-vandalised-yesterday-1042493
गेल्या वर्षी बांगलादेशमध्ये नवरात्री उत्सवात दुर्गा पूजा मंडपावर हल्ले झाले होते. तसेच ढाका येथील श्री श्री राधाकृष्ण इस्कॉन मंदिरावरही देखील काही लोकांनी हल्ला केला होता. यावेळी जमावाने मंदिराची तोडफोड केली होती. गेल्या काही वर्षांमध्ये बांग्लादेशमध्ये हिंदू मंदिरांवर जमावाने हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर आली आहेत.
AKS ही संस्था बांगलादेशमधील अल्पसंख्यांकांच्या हक्कासाठी काम करते. या संस्थेने तयार केलेल्या एका अहवालानुसार, गेल्या नऊ वर्षात बांगलादेशमधील अल्पसंख्यांकांवर हल्ला झाल्याच्या ३,६७९ घटना घडल्या आहेत. यादरम्यान १ हजार ६७८ धार्मिक स्थळांची तोडफोड करण्यात आली आहे. यामध्ये हिंदूंना लक्ष करत त्यांच्या घरांची, मंदिरांची आणि मालमत्तांची तोडफोड करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
केवळ १ रुपया मानधन; मतदारसंघात सायकलने प्रवास, आपच्या आमदाराची होतेय देशात चर्चा
अनिल देशमुखांच्या १०० कोटी वसुली प्रकरणला वेगळं वळण, देशमुखांना मिळणार क्लीन चीट
‘मी चित्रपट पाहिला नाही पण..,’ ‘द काश्मीर फाइल्स’वर नाना पाटेकरांचं मोठं विधान