बंगालमध्ये पुन्हा घरवापसी, भाजपमध्ये गेलेले नेते पुन्हा तृणमूलमध्ये दाखल; भाजपवर डाव उलटला

पश्चिम बंगाल राज्यात तृणमूल काँग्रेस पक्षाचे सरकार आले. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा मान ममता बॅनर्जी यांनी मिळवला आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाला निवडणुकीच्या वेळेस सोडून गेलेले नेते परत पक्षात परतत आहेत.

तृणमूल काँग्रेस पक्षाच्या माजी आमदार सोनाली गुहा यांना पक्षात प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी पक्षावर जोरदार टीका करत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. पण आता त्यांनी परत ममता बॅनर्जी यांची माफी मागितली आहे.

त्यांनी ममता बॅनर्जी यांची माफी मागून त्यांना परत पक्षात घेण्याची विनंती केली आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की भावनेच्या आहारी जाऊन मी भाजप पक्षात प्रवेश केला होता. पण ती माझी सर्वात मोठी चूक होती.

मी ममतांशिवाय जगू शकत नाही असेही त्यांनी पुढे म्हटले आहे. दीदींनी मला माफ करावे. त्यांनी मला माफ केले नाही तर मी जगू शकणार नाही असेही त्यांनी पुढे पत्रात म्हटले आहे.

सोनाली गुहा ह्या तृणमूल काँग्रेसकडून तब्बल ४ वेळा आमदार राहिलेल्या आहेत. त्यांची राज्यात ममतांनी उत्तराधिकारी म्हणूनच ओळख होती. पण तिकीट न मिळाल्यावर बाकीच्या नेत्यांप्रमाणे त्यांनी पण भाजपमध्ये प्रवेश केला.

सोनाली गुहा यांनी पुढे म्हटले आहे की, भाजपने फक्त माझा वापर करून घेतला. भाजपने मला ममतांच्या विरोधात बोलायला मला दरवेळी प्रेरित केले पण मी काहीच बोलले नाही. आता मी त्यांना न सांगताच तृणमूल पक्षात प्रवेश करणार आहे.

ताज्या बातम्या
भाजपचे नेते आचार्य भोसलेंची भविष्यवाणी ठरली खोटी; ४० दिवसांनंतर पण उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री

सोनूने सगळ्यांचा भरोसा तोडत लावला चूना, १३ जणांशी लग्न करून चिक्कार लुटलं

दिल्लीचे नाव जोपर्यंत इंद्रप्रस्थ ठेवले जात नाही तोपर्यंत देश संकटात असेल: सुब्रमण्यम स्वामी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.