Share

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर बंदी घाला, खासदाराने केली मागणी

mp-ajmal.j

सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. तसेच या चित्रपटाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची देखील मोठी पसंती मिळत आहे. काश्मिरी पंडितांच्या प्रश्नावर हा चित्रपट भाष्य करतो. या चित्रपटाच्या निमित्ताने दोन गट पडले आहेत. एक गट चित्रपटाच्या बाजूने आहे, तर दुसरा गट चित्रपटाच्या विरोधात आहे. सोशल मीडियावर या दोन्ही गटांमध्ये सध्या वाद सुरु आहे.(Ban on ‘The Kashmir Files’, MP demands)

यादरम्यान आसाममधील एका खासदाराने ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. बदरुद्दीन अजमल असे या खासदाराचे नाव आहे. ‘या चित्रपटामुळे जातीय तणाव निर्माण होईल. त्यामुळे ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर केंद्र सरकारने आणि आसाम सरकारने बंदी घातली पाहिजे’, अशी मागणी खासदार बदरुद्दीन अजमल यांनी केली आहे.

यावेळी खासदार बदरुद्दीन अजमल म्हणाले की, “मी ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पहिला नाही. केंद्र सरकारने आणि आसाम सरकारने या चित्रपटावर बंदी घातली पाहिजे. या चित्रपटामुळे जातीय तणाव निर्माण होईल.सध्याची भारतातील परिस्थिती पूर्वीसारखी नाही. आसाममधील नेल्लीच्या घटनेसह काश्मीर बाहेर अनेक घटना घडल्या आहेत. परंतु त्यांच्यावर कधी चित्रपट आला नाही”, असे खासदार बदरुद्दीन अजमल म्हणाले आहेत.

बदरुद्दीन अजमल हे आसाममधील ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटचे खासदार आहेत. ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटामुळे जातीय तणाव निर्माण होईल, असे म्हणत खासदार बदरुद्दीन अजमल यांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटाचे कौतुक केले होते.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “द कश्मीर फाइल्ससारखे सिनेमे बनायला हवेत. असा सिनेमातून सत्य जनतेसमोर येत असते. गेल्या अनेक दशकांपासून जे सत्य लपवण्याचा प्रयत्न झाला त्याला समोर आणलं जात आहे. त्यामुळे जे लोक सत्य लपवण्याचा प्रयत्न करतायेत ते आज विरोध करत आहेत, असा टोला पंतप्रधान मोदींनी नाव न घेता काँग्रेसला लगावला होता.

‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, चिन्मय मांडलेकर आणि मृणाल कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाने तीन दिवसांत २७ कोटी रुपयांची कमाई केली होती. सोशल मीडियावर या चित्रपटाचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले होते.

महत्वाच्या बातम्या :-
रोहितच्या मते ‘हा’ खेळाडू आहे सगळ्यात खतरनाक, म्हणाला, ‘४० मिनीटात मॅचचा नक्शा बदलून टाकतो’
‘हिजाब घातल्याशिवाय महाविद्यालयात जाणार नाही, कायदेशीर लढा देणार’, मुस्लिम मुलींचा निर्णय
तारक मेहताच्या चाहत्यांना धक्का! ‘या’ कारणामुळे बबीता जी सोडणार शो, मालिकेत नव्या अभिनेत्रीची एंन्ट्री

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now