मोठी बातमी! महाराष्ट्रात मतपत्रिकेनं मतदान होणार

मुंबई | स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकीत राज्यातील मतदारांना ईव्हीएम व्यतिरिक्त मतपत्रिकेव्दारे देखील मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्याच्या सूचना विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या आहेत. याबाबत कायदा करण्याच्या सूचना विधानमंडळाला अध्यक्षांनी दिल्या आहेत.

नागपूरचे प्रदीप महादेवराव उके यांनी यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांना निवेदन दिले होते. यावर विधानभवन मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

अर्जदाराकडून अ‍ॅड. सतीश उके यांनी यासंदर्भात दिलेल्या निवेदनातील भुमिका स्पष्ट करताना सांगितले की, राज्यातील मतदारांना ईव्हीएम व्यतिरिक्त मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याचा विकल्प मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. ईव्हीएम की मतपत्रिका हे मतदारांना ठरवू द्या, तसेच याबद्दल जनभावनेची दखल घेऊन कायदा करणे विधानमंडळाची जबाबदारी आहे.

भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद ३२८ प्रमाणे राज्यातील निवडणूकांबाबत कायदा करण्याचा अधिकार राज्य विधान मंडळाला आहे. यानुसार ईव्हीएम आणि मतपत्रिका असे दोन्ही पर्याय उपलब्ध करुन देण्यात यावे. मतदार त्यांच्या इच्छेने मतदानाचा हक्क कोणत्याही एका प्रक्रियेने बजावू शकतील. असे उके यांनी म्हटले आहे.

या बैठकीसाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, विधानपरिषद सदस्य अभिजित वंजारी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव राजेंद्र भागवत, महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग आणि राज्याचे विधी व न्याय विभागाचे सचिव भूपेंद्र गुरव उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-
शिवसेनेच्या ढाण्या वाघाची दिल्लीत डरकाळी; संजय राऊत पोहचले गाझीपूर बॉर्डरवर
मोदी सरकारकडून खुशखबर! वाहनांच्या किंमती ३० टक्क्यांनी उतरणार
मोदी सरकार आणखी दोन बॅंका विकण्याच्या तयारीत
क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! महाराष्ट्रातच रंगणार आयपीएलच्या सर्व लढती, ‘या’ पाच स्टेडियमची निवड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.