Share

उत्सूकता शिगेला! ‘या’ तारखेला येतोय ‘बाळासाहेबांचा राज’; जाणून घ्या सविस्तर…

लवकरच मराठी रंगभूमीवर बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल एक नाटक येणार आहे. ‘बाळासाहेबांचा राज’ असे या नाटकाचे नाव आहे. हे नवीन नाटक लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे.

येत्या २३ जानेवारीला हे नाटक रंगभूमीवर सादर केले जाणार आहे. प्रभादेवीच्या नाट्य मंदिरात या नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे. मनसे पक्षाच्या नेत्यांच्या सहकार्याने हे नाटक बसवण्यात आले आहे. नाटकाच्या नावानेच रसिकांची उत्सुकता वाढवली आहे.

जोगेश्वरीच्या काही कलाकार मंडळींनी हे नाटक बसवले आहे. या नाटकाचे पोस्टरही आले असुन प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच शिगेला पोहचली आहे. मनसेचे समर्थक या नाटकाला मोठ्या संख्येने हजेरी लावतील अशी अपेक्षा केली जात आहे.

बाळासाहेब आणि बाळासाहेबांचे पुतणे तथा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या दोघांच्या नात्यावर बोलणारे हे नाटक आहे का? असे प्रश्न लोकांच्या मनात आहेत. अशा पद्धतीने या दोघांच्या नात्यावर बोलणारे हे पहिलेच नाटक असेल.

मुंबईला प्रभादेवी येथे २३ जानेवारीला या नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे. नाटकाच्या पोस्टरचे अनावरण झाले आहे. पोस्टर भगव्या रंगाचे असून त्यावर बाळासाहेबांच्या फोटोसह राज ठाकरेंचादेखील फोटो बघण्यास मिळत आहे.

या नाटकाची निर्मिती गणेश कदम यांनी केली असून अनिकेत बंदरकर यांनी या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. तसेच मनसे नेते बाळा नांदगावकर, राजू पाटील, अमेय खोपकर, अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. २३ जानेवारीला दुपारी ४.३० वाजता या नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे.

महत्वाच्या बातम्या
वारसा असतानाही रितेश राजकारणात का नाही आला? अखेर रितेशने स्वतःच उघड केले खरे कारण
जेव्हा राज ठाकरेंनी भैय्या टॅक्सीवाल्याला रस्त्यातच अडवून खाली उतरवलं; ठाकरेंनीच सांगीतला किस्सा
मनसेचे सगळे नेते पहिल्या रांगेत मात्र वसंत मोरे मागच्या कोपऱ्यात; राज ठाकरेंच्या भाषणावेळी १ तास उभे

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now