‘पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं’ बाळासाहेब थोरातांचं पहिल्यांदाच खुलं निमंत्रण

मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एका मुलाखती दरम्यान काँग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशातील जमिनदारासारखी झाली आहे, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानानंतर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसल्या. आता शरद पवारांच्या टीकेनंतर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं असे खुले निमंत्रण थोरात यांनी शरद पवार यांना दिलं आहे. त्यामुळे थोरात यांच्या या निमंत्रणावर राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांना थेट काँग्रेसमध्ये येण्याचं आवाहन केलं. तसेच काँग्रेसची अवस्था जमीनदारी गेलेल्या जमीनदारासारखी झाली आहे या पवारांच्या विधानाशी असहमत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले शरद पवारांच्या विधानाशी असहमत आहे.

काँग्रेसने कधीही जमीनदारी केली नाही. काँग्रेसचे विचार पुरोगामी विचार आहेत. पण, आता याच तत्वाला कठीण दिवस आले आहेत. माणसांत आणि समाजात भेट निर्माण केले जात आहेत. आपण एका विचाराचे आहोत. पवारांनी टीका-टीप्पणी करण्यापेक्षा काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यायला हवं. युपीए म्हणून एकत्र होतो आणि सहकारी म्हणूनही एकत्र होतो.

युपीएचा कारभार चांगला होता, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. काँग्रेस हा एक विचार आहे. काँग्रेसच्या विचारला कठीण दिवस आले आहेत. कारण धार्मिक भेदाभेद करणारे वाढले आहेत. आपण एका विचाराचे आहोत. आपण सर्व एकत्र आलो तर काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस येतील, असं ते म्हणाले.

तसेच बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर देखील जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, किरीट सोमय्यांचे वक्तव्य आणि ईडीच्या कारवाईवरही त्यांनी भाष्य केले. सोमय्या बोलतात आणि ईडी वागते, असंच लोकांना वाटतं. तपास यंत्रणा आता राजकारणासाठी होतो हे कळून चुकलं आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

काय म्हणाले होते शरद पवार?

एका मुलाखती दरम्यान रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार हे सगळं हिरवंगार शिवार माझं होतं, असं सांगतो. काहीशी तशीच अवस्था आजच्या काँग्रेसची झालीय.” असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसला डिवचलं होत. व या टीकेनंतर काँग्रेसमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. व म्हणूनच पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं असे खुले निमंत्रण बाळासाहेब थोरात यांनी दिल आहे.
महत्वाच्या बातम्या
पुरावे मिळालेत, सोमवारी आणखी एका मंत्र्याचा घोटाळा समोर आणणार; किरीट सोमय्या पुन्हा बाॅम्ब फोडणार 
“एवढ्या रात्री ती काय करत होती? तिचे कपडे चुकले असतील! सगळं तिचंच चुकलं असणार” 
काय डोकं आहे! चक्क फिल्मी अंदाजात चमचाने बोगदा खाणुन कैदी तुरुंगातुन फरार  
महाराष्ट्रात ढगफूटीचा कहर! आतापर्यंत देशात एक नंबर; वाचा तज्ञांचा इशारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.