“नोटाबंदी, टाळेबंदी, इंधन दरवाढ या उघड्या डोळ्यांनी केलेल्या घोडचुका कधी सुधारणार?”

मुंबई : लाखो सामान्य गुंतवणूकदार, ज्येष्ठ नागरिकांना धक्का देणारा अल्प बचतीच्या योजनांवरील व्याजदरात कपातीचा निर्णय केंद्र सरकारने अखेर काही तासांत बदलला. व्याजदर कपात मागे घेत ते ‘जैसे थे’च ठेवल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी सकाळीच जाहीर केले.

यावरून आता राजकारण सुरु झाले आहे. काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारने घेतलेल्या यु-टर्नवरुन निशाणा साधला आहे. “नोटाबंदी, टाळेबंदी, चुकीच्या पद्धतीने केलेली GST ची अंमलबजावणी, इंधन दरवाढ या तर उघड्या डोळ्यांनी केलेल्या घोडचुका आहेत त्या कधी सुधारणार?,” अशी विचारणाच थोरात यांनी केली आहे.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी एक ट्विट करून केंद्राने व्याजदर कपातीचा घेतलेला निर्णय आणि तो परत घेणे यावर संशय व्यक्त केला आहे. निवडणुकांनंतर कदाचित मागे घेतलेला निर्णय पुन्हा लागू केला जाऊ शकतो, अशी शंका चव्हाण यांनी घेतली आहे.

‘नजरचूक वगैरे काही नाही! पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय मागे घेण्यात आला असावा. परंतु, आज १ एप्रिल आहे. हे #AprilFools पण असू शकतं. निवडणूक संपल्यावर कदाचित आज मागे घेतलेला निर्णय पुन्हा लागू केला जाऊ शकतो, असे चव्हाण यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

वाचा काय होता निर्णय?
केंद्र सरकारने 1 एप्रिल या नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपूर्वीच सामान्यांना मोठा आर्थिक झटका दिला होता. केंद्राने जवळपास सर्वच बचत योजनांमध्ये व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला होता.

यात पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात गुंतवणूक करणाऱ्यांना सरकारनं धक्का देत व्याज दरात ७० बेसिस पॉईंटची कपात केली होती. पीपीएफचा व्याजदर ७.१ टक्के होता. परंतु केंद्राच्या निर्णयामुळे तो ६.४ टक्क्यांवर आला होता. मात्र आता पूर्वीप्रमाणेच ७.१ टक्के व्याजदर मिळणार आहे.

पाच वर्षांच्या नॅशनल सेविंग्स स्कीमवरील व्याजदरातही ९० बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली होती. आधी गुंतवणुकीवर ६.८ टक्के व्याज मिळायचं. हे व्याजदर आता कायम राहणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

अभिनेत्री, खासदार किरण खेर यांना ब्लड कॅन्सर; मुंबईत उपचार सुरु

लहान मुलांची काळजी घ्या! लहान मुलांना होतोय कोरोना; मार्च महिन्याची धक्कादायक आकडेवारी आली समोर

किशोर कुमारच्या पत्नीसोबत रोमान्स करणे जितेंद्रला पडले महागात; किशोर कुमारने दिली होती धमकी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.