“एअर इंडिया विकणाऱ्या आणि रेल्वे विकायला निघालेल्यांनी एसटीवर बोलू नये”

एसटी कामगारांच्या आंदोलनामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. लवकरात लवकर एसटी महामंडळाचे शासनात विलिणीकरण करावे अशी मागणी कामगारांकडून केली जात आहे. याच मुद्यावरुन विरोधी पक्षनेतेही राज्य सरकारवर निशाणा साधताना दिसत आहे.

विरोधी पक्षाच्या टीकेला सत्ताधारी पक्षातील नेतेही उत्तर देताना दिसून येत आहे. आता राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर टीका केली आहे. ज्यांनी एअर इंडिया विकली त्यांनी एसटीवर बोलू नये, असे बाळासाहेब थोरातांनी म्हटले आहे.

ज्यांनी एअर इंडिया विकली, रेल्वे विकायला निघाले आहेत. त्यांनी एसटीवर बोलू नये. त्यांना एसटीवर बोलण्याचा बिलकूल अधिकार नाही, अशी घणाघाती टीका बाळासाहेब थोरातांनी भाजपवर केली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली आहे.

एसटी कामगारांच्या हिताची आम्ही जपणूक करत आहोत. या संपातून तोडगा काढण्याचा परिवहन मंत्री अनिल परब प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत, म्हणून या प्रश्नात अनिल परब लक्ष घालत असून त्यावर काही ना काही मार्ग निघेलच. पण काही लोक एसटीचा संप पेटवण्याचा प्रयत्न करत आहे, हे सर्वांना दिसत आहे, असे थोरातांनी सांगितले आहे.

दरम्यान, बाळासाहेब थोरातांनी कंगना राणावत आणि अभिनेते विक्रम गोखले यांच्यावरही टीका केली आहे. कंगना राणावत काय बोलते? स्वातंत्र्यावर बोलण्याची तिची लायकी तरी आहे का? कंगनाचे बोलणे पुर्णपणे चुकीचे आहे, असे बाळासाहेब थोरातांनी म्हटले आहे.

तसेच कंगना वादग्रस्त बोलते आणि संरक्षण मिळवते.पद्मश्री मिळतो. कंगनाला मिळालेला पद्मश्री आणि संरक्षण पाहून विक्रम गोखलेही बोलायला लागले आहे. त्यांनाही मिळून जाईल, असा टोला बाळासाहेब थोरातांनी विक्रम गोखले यांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-
तुमच्याकडे ‘हे’ 2 रुपयांचे नाणे असेल तर घरी बसून मिळतील 5 लाख; जाणून घ्या काय करावे
कृषी कायदे पुन्हा आणणार; मोदींच्या जवळच्या बड्या भाजप नेत्याचे वक्तव्य
‘या’ कारणामुळे भाजप नेते वरूण गांधी तृणमूल काॅंग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.