बाळासाहेब ठाकरे यांच्या एका धमकीनंतर शाहरुख खानची हवा झाली होती टाईट मग..

फिल्म इंडस्ट्रीमधील कलाकारांची अनेक वेळा भांडण झाली आहेत. पण ही भांडण कधी कधी खुप जास्त वाढतात. त्यामूळे हि भांडण थांबवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीलामध्ये यावं लागत. असाच एक किस्सा किंग खान शाहरुख खानचा आहे.

शाहरूख खान बॉलीवूडचा सुपरस्टार आहे. त्याने त्याच्या जोरावर बॉलीवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. शाहरुख खान जेव्हापासून बॉलीवूडमध्ये यशस्वी झाला आहे. तेव्हापासून तो स्वतः ला ब्रँड समजून चालतो. स्वतः ची ही ओळख टिकवून ठेवण्यासाठी शाहरुख खान नेहमी प्रयत्न करत असतो.

तो त्याची सर्व काम पूर्ण करतो. पण जर या ब्रँडला कोणी काही बोलले. तर मग मात्र तो गप बसत नाही.
वानखेडे स्टेडियममध्ये आयपीएल दरम्यान शाहरुख खान आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेली भांडणे तर सर्वांनाच माहीती आहेत. पण या अगोदरसुध्दा शाहरुख खान आणि सुरक्षा रक्षकांमध्ये भांडण झाले आहे.

जाणून घेणार आहोत शाहरुख खान आणि सुरक्षा रक्षक यांच्यामध्ये भांडण कधी झाली? आणि कोणाच्या सांगण्यावरून शाहरुखला त्याचा राग कंट्रोल करावा लागला होता. हा किस्सा आहे ११ जानेवारी १९९७ चा.

दिग्दर्शक फिरोज नाडीयडवाला यांनी त्यांचा नवीन येणार चित्रपट ‘रफतार’साठी एका पार्टीचे आयोजन केले होते. ही पार्टी मुंबईच्या ओब्रॉय टॉवरमध्ये होती.
या पार्टीमध्ये मुंबईतील अनेक मोठी मोठी माणसे आली होती. त्यासोबतच बॉलीवूडमधले देखील अनेक मोठे मोठे कलाकार आले होते.

जसे की संजय दत्त, अक्षय कुमार, मनीषा कोईराला आणि जुही चावला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पार्टीमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे देखील आले होते. शाहरुख खानला देखील या पार्टीमध्ये बोलवण्यात आले होते. असे बोलले जाते की बॉलीवूडमध्ये अशी मोठी पार्टी पहिल्यांदा होत होती.

या पार्टीमध्ये अनेक मोठे मोठे लोक आले होते. त्यामूळे तिथे खुप कडक security होती. ओब्रॉय टॉवरच्या प्रत्येक गेटवर सुरक्षा रक्षक होते. एवढेच नाही तर तिथे मेटल डिटेक्टरसुध्दा लावण्यात आले होते.

शाहरुख खान जेव्हा या पार्टीमध्ये येत होता. तेव्हा मेटल डिटेक्टरमूळे सुरक्षा रक्षकांनी शाहरुख खानला चेक केले. त्यावेळी शाहरुख खान जवळ एक फुल्ल लोडेड गन होती.

त्यामूळे सर्वांना धक्काच बसला. जेव्हा सुरक्षा रक्षकांनी शाहरुखला गनबद्दल विचारले. तेव्हा त्याने सांगितले की, ‘मला सध्या खुप धमक्या येत आहेत. म्हणून ही गन मी माझ्या सुरक्षेसाठी ठेवली आहे.’

यावरूनच वादाला सुरुवात झाली. कारण त्या सुरक्षा रक्षकांनी शाहरुखला ती गन पार्टीत घेऊन जाता येणार नाही. असे सांगितले. मग काय शाहरुख खानला या गोष्टीचा खुप राग आला.

कारण शाहरुख खान बॉलीवूडचा सुपरस्टार होता. शाहरुख खान त्यावेळी वाटले की, एक सुरक्षा रक्षक शाहरुख खानला नाही कसा बोलू शकतो. मग काय शाहरुख खान आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद वाढला.

त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी शाहरुख खानला या गनचे कागदपत्रे दाखवण्यास सांगितले. पण त्याने या गोष्टीला नकार दिला. तो म्हणाला की, ‘तुला माहीत आहे ना मी शाहरुख खान आहे.’ यावर सुरक्षा रक्षकांनी उत्तर दिले की, ‘हा असाल तुम्ही शाहरुख खान. पण नियम हे नियम असतात.’

यावर शाहरुख खानचा राग डबल वाढला. त्याने या पार्टीचा आयोजक फिरोज नाडीयडवालाला बोलवायला सांगितले. पण फिरोज नाडीयडवाला त्यांच्या पार्टीत व्यस्त होते. ते खाली यायला तयार नव्हते.

यावर शाहरुख खान एवढा चिडला की त्याने फिरोज नाडीयडवाला यांना वाईट बोलायला सुरुवात केली. एवढंच नाही तर तो या चित्रपटात काम करणाऱ्या संजय दत्तला आरोपी आणि अक्षय कुमारला वेटर देखील बोलला.

भांडण खुप वाढत होते. पण फिरोज नाडीयडवाला पार्टीसोडून यायला तयार नव्हते. मग ही सर्व गोष्ट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना समजली.
त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी शाहरुख खानसाठी एक संदेश पाठवला.

ते शाहरुख खानला म्हणाले की, ‘हे सर्व प्रकरण लवकरात लवकर संपव आणि सुरक्षा रक्षकांना त्या गनचे कागदपत्रे आणि लायसन्स दाखव. जर त्याने असे केले नाही तर मग मी स्वतः या सर्व प्रकरणात पडेल आणि बघेल की शाहरुख खानचे चित्रपट थेअटरमध्ये रिलीजच कसे होतात?

हा संदेश शाहरुख खानपर्यंत पोहोचला. त्यानंतर शाहरुख खानचे डोके चांगलेच ठिकाण्यावर आले. त्याला त्याची चुक समजली. त्यानंतर शाहरुख खानने लगेच सुरक्षा रक्षकांची माफी मागितली. एवढं नाही तर त्याने स्वतः गाडीतून गनची कागदपत्रे आणून त्यांना दाखवली.

मग सुरक्षा रक्षकांनी शाहरुख खानला आतमध्ये जाण्याची परवानगी दिली. पार्टीमध्ये गेल्यानंतर शाहरुख खान खुप शांत होता. तो कोणाशी जास्त बोलला नाही. पण या घटनेनंतर शाहरुख आणि फिरोज नाडीयडवाला यांच्यामध्ये खुप भांडण झाले आणि त्यानंतर त्या दोघांनी कधीच एकत्र काम केले नाही.

महत्त्वाच्या बातम्या –
क्रूरतेचा कळस! हत्तीच्या अंगावर फेकला पेटलेला टायर, यातना सहन न झाल्याने हत्तीचा मृत्यू
जुन्या १०० रुपयांच्या नोटा चलनातून होणार बाद? आरबीआयने दिली महत्वाची माहिती
आरबीआयकडून ‘या’ नोटा चलनातून बाद करण्याच्या हालचाली सुरु; पुन्हा एकदा नोटबंदी?
मानसी नाईक पाठोपाठ आणखी एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री अडकली लग्नबेडीत; पहा फोटो..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.