तेव्हा बाळासाहेब अमिताभला म्हणाले, मी बघतोच कोण तुमचा चित्रपट रिलीज होऊ देत नाही

बॉलीवूडमध्ये जेव्हा एखाद्या कलाकाराचे चित्रपट हिट व्हायला सुरुवात होते. तेव्हा त्याला बॉलीवूडमध्ये वेगवेगळी नावे दिली जातात. जसे की सलमान खानला भाईजान, शाहरुख खानला किंग खान आणि आमिर खानला मिस्टर परफेक्टनिस बोलले जाते.

या सर्वांनामध्ये सर्वात मोठे आहेत बॉलीवूडचे शहेंशाह म्हणजेच अमिताभ बच्चन. पण खऱ्या आयुष्यात शहेंशाह तोच असतो ज्याच्याकडे सगळी पॉवर असते.

आज आपण असाच एक किस्सा जाणून घेणार आहोत. ज्यात बॉलीवूडच्या शहेंशाहला खऱ्या आयुष्यातील शहेंशाहपुढे झुकावे लागले. जाणून घेऊया कधी अमिताभ बच्चन यांना खऱ्या आयुष्यातील शहेंशाहपुढे झुकावे लागले आणि त्यांनी अमिताभ बच्चन यांची मदत कशी केली?

हा किस्सा आहे १९८४ सालचा. त्यावेळी अमिताभ बच्चन यांचे करिअर खूप चांगले सुरू होते. ते यशाच्या शिखरावर होते. ते सर्वात मोठे आणि प्रसिद्ध अभिनेते आहेत.

असे बोलतात ना माणूस एका क्षेत्रात प्रसिद्ध असेल. तर त्याला त्याच्या त्या प्रसिद्धीचा फायदा दुसऱ्या क्षेत्रात देखील घ्यायला हवा. म्हणूनच अमिताभ बच्चन यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला.

अमिताभ बच्चन यांचे राजकारणातील गांधी कुटुंबाशी खूप चांगले संबंध होते. त्यामुळे त्यांना अनेकांनी राजकारणात येण्याचा सल्ला दिला. अमिताभ बच्चन राजीव गांधीचे खूप चांगले मित्र होते. त्यामुळे त्यांनी तो सल्ला ऐकला.

अमिताभ यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. आलाहाबाद म्हणजे आजचे प्रयाग राज येथून ते निवडणुकीसाठी उभे राहिले. त्यांना त्यात चांगले यश मिळाले आणि त्यांनी निवडणूक जिंकली.

अमिताभ बच्चन यांच्यासाठी राजकारण खूप नवीन होते. त्यांना राजकारणातले एवढे ज्ञान नव्हते. ते निवडणूक तर जिंकले होते. पण खूप कमी वेळातच त्यांचे नाव एका मोठ्या घोटाळ्यात अडकले.

हा घोटाळा होता बोफोर्स गन घोटाळा. हा भारतीय राजकारणातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा मानला जात होता. अमिताभ बच्चन फिल्म इंडस्ट्रीशी निगडित होते. त्यामूळे त्यांना राजकारणातील डावपेच कळत नव्हते.

त्यांना हा घोटाळा कशाचा आहे आणि त्यांचे नाव यात कसे आले? हेच कळत नव्हते. ते त्यांच्या फिल्म इंडस्ट्रीमधील यशाला सोडून राजकारणात आले होते. पण त्यांना आत्ता ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक वाटत होती.

त्यामुळे त्यांनी लवकरच राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये परत यायचे होते. पण या कालावधीमध्ये बॉलीवूडमध्ये मिथुन चक्रवर्ती, जितेंद्र असे नवीन कलाकार आले होते.

या नवीन चेहऱ्यांसमोर अमिताभ बच्चन यांना परत येणे सोपे नव्हते. त्यांना एका सुपरहिट चित्रपटाची गरज होती. त्यांनी तसे प्रयत्न सुरू केले.

ज्या वेळी अमिताभ बच्चन राजकारणात गेले होते. त्यावेळी जया बच्चन घरी मुलांना सांभाळत होते. पण तरी त्यांनी त्यांची आवड सोडली नव्हती. त्या एका स्क्रिप्टवर काम करत होत्या.

ही स्क्रिप्ट पूर्ण झाली होती. त्यानंतर त्यांनी इंद्रराज आनंद आणि त्यांचा मुलगा टिनु आनंद या दोघांना या चित्रपटासाठी निवडले. या चित्रपटात मुख्य भुमिकेसाठी जॅकी श्रॉफला साइन करण्यात आले होते. हा चित्रपट होता ‘शहेंशाह’.

पण त्यावेळी अमिताभ बच्चन राजकारण सोडून मुंबईत आपल्या परिवाराजवळ आले होते. त्यांना जया बच्चन यांनी ‘शहेंशाह’ चित्रपटाची कथा ऐकवली. त्यांना ती खूपच आवडली आणि त्यांनी त्या चित्रपटात काम करण्याची इच्छा जाहीर केली.

त्यानंतर जया बच्चन यांनी जॅकी श्रॉफला समजावून सांगितले की, अमिताभला या चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे. त्यामूळे जॅकी यांनी देखील नकार दिला नाही. त्यांनी हा चित्रपट सोडला.

चित्रपटाची शुटिंग सुरू झाली. शुटिंग पुर्ण झाल्यानंतर मात्र या चित्रपटाच्या खऱ्या अडचणी सुरू झाल्या. कारण अमिताभ बच्चन यांचे नाव राजकारणातील सर्वात मोठ्या घोटाळ्यात अडकले होते.

सुरुवातीला हा चित्रपट नोव्हेंबर १९८७ ला रिलीज होणार होता. पण विरोधी पक्षांनी अमिताभ यांच्या गोफर्स घोटाळ्याच्या प्रकरणाला मुद्दा बनवून चित्रपटाला विरोध केला.

या चित्रपटाला आम्ही रिलीज होऊ देणार नाही. असे सांगितले. यामुळे अमिताभ बच्चन यांचा कमबॅक खुप मोठ्या अडचणीत अडकला होता. त्यांना काय करावे काही कळत नव्हते.

अशा वेळी अमिताभ बच्चन यांनी या सर्व प्रकरणात बाळासाहेब ठाकरे यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. कारण त्यांना माहीत होते की ते निर्दोष आहेत. त्यांना या प्रकरणात फसवले जात आहे.

अमिताभ यांनी मुंबईतील वातावरण नीट करण्यासाठी मुंबईतील खरे शहंशाह म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. अमिताभ बच्चन आणि त्यांची टिम बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला गेली.

बाळासाहेब ठाकरे यांनी अमिताभला सगळे प्रकरण विचारले. त्यावेळी त्यांनी काहीही लपवून न ठेवता सगळे काही खरे खरे बाळासाहेब ठाकरे यांना सांगितले.

हे पूर्ण प्रकरण ऐकल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांना वाटले की अमिताभ बच्चन खरंच निर्दोष आहेत. ते एक चांगले अभिनेते आहेत. त्यांना या सगळ्या प्रकरणात फसवले गेले आहे.

बाळासाहेब ठाकरे अमिताभ बच्चन यांना म्हणाले की, ‘मी तुमच्यासोबत आहे. तुम्ही जा आणि तुमचा चित्रपट महाराष्ट्रात रिलीज करण्याची तयारी करा. मी बघतोच की कोण तुमचा चित्रपट रिलीज होऊ देत नाही.’

बाळासाहेब ठाकरे यांच्या या शब्दांनी अमिताभ बच्चन यांचा आत्मविश्वास खुप वाढला. त्यांनी चित्रपटाच्या रिलीजची तयारी सुरू केली.

बाळासाहेब ठाकरे अमिताभ बच्चनसोबत आहेत ही गोष्ट सगळ्यांना माहिती झाली होती. त्यामूळे या चित्रपटाला विरोध करणारे विरोधी पक्षनेते काहीही करू शकले नाहीत.

हा चित्रपट एक दिवस अगोदरच रलीजी झाला होता. १९८८ च्या फेब्रुवारी महिन्यात हा चित्रपट रिलीज झाला आणि त्या वर्षीचा सुपरहिट चित्रपट ठरला. अमिताभ बच्चन यांना हवा तसा कमबॅक मिळाला होता.

या घटनेनंतर अमिताभ बच्चन आणि बाळासाहेब ठाकरे यांचे संबंध आणखीनच चांगले. या मदतीसाठी अमिताभ बच्चन बाळासाहेब ठाकरे यांचे नेहमी आभार मानत असत. कारण हा चित्रपट रिलीज झाला नसता तर त्यांचे करिअर संपले असते.

प्राजक्ता पंदिलवाड

महत्वाच्या बातम्या-
स्वतःच्या कामगिरीवर खुश! मोहम्मद सिराजने स्वतःलाच दिलं जबरदस्त गिफ्ट
जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला
क्रूरतेचा कळस! हत्तीच्या अंगावर फेकला पेटलेला टायर, यातना सहन न झाल्याने हत्तीचा मृत्यू
याला म्हणत्यात निष्ठा! शंभर कोटी व मंत्रीपदाची भाजपची ऑफर धुडकावणारा बहाद्दर  

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.