जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला

महाराष्ट्राचे राजकारण ज्यांचे नाव घेतल्याशिवाय पुर्ण होणार नाही ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. आज त्यांचा आठवा स्मृती दिन. शिवसेना म्हणजे बाळासाहेब आणि बाळासाहेब म्हणजे शिवसेना असे समिकरण होते. आता बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत उद्धव ठाकरे शिवसेनेची धुरा संभाळत आहेत. जोडीला आदित्य ठाकरेही आहेत.

ठाकरे घराण्याचा स्वाभिमान, जवाबदारी असणारी शिवसेना सोडण्याचा निर्णय स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला होता असे जर आम्ही तुम्हाला सांगितले तर म्हणचाल काय बोलताय हे? अहो पण हे खरं आहे. आता ते कसं? मग वाचा…

हिंदूहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे हयात होते तेव्हा आणि नंतर अनेकांनी शिवसेना सोडली, पण स्वतः बाळासाहेब ठाकरेंनीच शिवसेना पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता अस जर आम्ही म्हटलं तर किती जणांना खरं वाटेल? असं काय झाल होतं की बाळासाहेबांनीच शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला?

जेष्ट पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी लिहलेल्या “जय महाराष्ट्र हा शिवसेना नावाचा इतिहास आहे” या पुस्तकात या घटनांबाबत उल्लेख करण्यात आला आहे. १९६६ साली बाळासाहेबांनी शिवसेना या पक्षाची स्थापना केली होती. पण त्यांच्याच कारकीर्दीत त्यांनी दोनदा आपला पक्ष सोडण्याचे जाहीर केले होते.

१९७८ साली विधानसभा निवडणूकीत पराभव मिळाल्याने त्याच वर्षी होणार्‍या मुंबई महानगर पालिकेची निवडणूक बाळासाहेबांनी प्रतिष्ठेची केली होती. “जर या निवडणूकीत शिवसेनेला यश मिळाले नाही, तर मी शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा देईन”. असे बाळासाहेबांनी जाहीर केले होते. परंतु आणिबाणी नंतर जनता पक्ष जोमात होता. मुंबईकरांनी शिवसेनेऐवजी जनता पक्षाला साथ दिली. आणि जनता पक्षाचा विजय झाला.

१९७३ साली पालिका निवडणूकीत शिवसेनेचे ४० नगरसेवक निवडून आले होते, परंतु १९७८ साली ही संख्या निम्मी होऊन २१ वर आली होती. यानंतर शिवाजी पार्कात झालेल्या सभेत बाळासाहेबांनी “मुंबई पालिकेवर भगवा फडकवण्यात मी अपयशी ठरलो. लोकांची माझ्यावर निष्ठा राहिली नाही. मी शब्दाला जागणारा मी माणूस आहे, म्हणून मी पक्षाचा राजीनामा देतो” असे म्हणून उपस्थित शिवसैनिकांना धक्का दिला.

दरम्यान बाळासाहेब हे शिवसैनिकांसाठी देव झाले होते आणि शिवसैनिक आपल्या देवाला सोडायला तयार नव्हते. सर्व शिवसैनिकांनी त्यांची प्रचंड मनधरणी केल्यानंतर बाळासाहेबांनी आपला शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला.

परंतु पुन्हा १४ वर्षांनंतर म्हणजेच १९९२ साली असाच धक्का बाळासाहेबांनी दिला. १९९२ साली जेव्हा शिवसेनेमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे वर्चस्व वाढायला लागले होते, तेव्हा ज्येष्ठ शिवसैनिक माधव देशपांडे यांनी बाळासाहेंबांवर घराणेशाहीचा आरोप करत शिवसेनेत कशा पद्धतीने कुणालाच मोठं होऊ दिलं जात नाही याचा पाढा वाचला. त्यांनी एक पुस्तिका प्रसिद्ध करुन त्यात काही नेत्यांची जंत्रीच सादर केली आणि “बाळासाहेब कसे कण्या टाकून कोंबड्या झुंजवत” असे पुस्तिकेत नमूद केले.

यासंबधी शिवसेनेतल्या नेत्यांनी आणि शिवसैनिकांनी काहीच प्रतिक्रिया न दिल्याने बाळासाहेबांचा राग अनावर झाला. त्यानंतर दुसर्‍या दिवशी १९ जुलै १९९२ रोजी त्यांनी सामनामध्ये एक अग्रलेख लिहला, त्याचे शीर्षक होते “अखेरचा दंडवत” आणि त्याद्वारे त्यांनी “आपण या पक्षात राहत नाही” असे जाहीर केले. या अग्रलेखानंतर शिवसैनिक मातोश्रीबाहेर जमले आणि बाळासाहेबांची मनधरणी करायला लागले.

अखेर बाळासाहेबांनी शिवसैनिकांचे ऐकले आणि आपला पक्ष सोडण्याचा निर्णय मागे घेतला. बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय शिवसेना कधीही पुर्ण होऊ शकत नाही. बाळसाहेबांनी शिवसेना वाढवली, फुलवली, छोट्या रोपाचं मोठं झाड बनवलं, मग बाळासाहेबांशिवाय शिवसेना कशी पुर्ण होऊ शकेल.

महत्वाच्या बातम्या
धक्कादायक! शेतकरी आंदोलनातील चार शेतकरी नेत्यांना गोळ्या घालून ठार मारण्याचा कट
क्रूरतेचा कळस! हत्तीच्या अंगावर फेकला पेटलेला टायर, यातना सहन न झाल्याने हत्तीचा मृत्यू
याला म्हणत्यात निष्ठा! शंभर कोटी व मंत्रीपदाची भाजपची ऑफर धुडकावणारा बहाद्दर
जुन्या १०० रुपयांच्या नोटा चलनातून होणार बाद? आरबीआयने दिली महत्वाची माहिती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.