तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचे ‘हे’ खास शौक माहित आहे का? वाचून आश्चर्यचकीत व्हाल

 

हिंदुहृदयसम्राट अशी ओळख निर्माण करणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. बाळासाहेब एक असे नेते होते जे त्यांच्या वक्तव्यांमुळे, व्यंगचित्रांमुळे आणि लेखनामुळे नेहमीच चर्चेत असायचे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खाण्याचे शौकिन होते. त्यांना सगळ्यात जास्त घरचे जेवण आवडायचे. या व्यतिरिक्त सीफुडची त्यांना प्रचंड आवड होती. मुंबई स्थित चर्चगेटजवळ असणारे रेस्टॉरंटचा इटॅलियन पास्ता पण त्यांना आवडत होता. त्यामुळे पास्ता खाताना ते नेहमीच तिथला पास्ता मागवायचे.

तसेच बाळासाहेब एका खास बियरचे आणि सिगारचे शौकिन होते. ते मार्को पोलो, थ्री नन्स आणि हेनरी ब्रँडच्या सिगारचे बाळासाहेबांना आवडत होत्या. तसेच हेनकेन ब्रँडची बियर त्यांच्या आवडीची होती. अनेकदा त्यांनी आपल्या आवडीनिवडी मुलाखतीत सांगितल्या आहे.

हेनकेन बियरमध्ये कॅलरिज जास्त असल्याने त्यांनी ती बियर सोडून व्हाईट वाईन पिण्यास सुरुवात केली होती. शाम चौगुले चंटीलीची व्हाईट वाईन ते प्यायचे.

बाळासाहेबांना गरम बियर आणि थंडी चहा आवडायची. गरम बियरचा अर्थ म्हणजे ते आपली बियर कधीही फ्रीजमध्ये ठेवायचे नाही. ते नेहमीच नॉर्मल टेंपरेचरवरची बियर प्यायचे.

बाळासाहेब आपल्या या गोष्टी नेहमीच घरात करायचे. कारण त्यांना या गोष्टी सार्वजनिक ठिकाणी करायला आवडत नव्हत्या. त्यांना या सर्व गोष्टी परदेशात जाणारे त्यांचे मित्र आणून द्यायचे.

राजकारणात आल्यानंतर त्यांच्या खाण्याची सवय सुटली पण ते वाईन आणि सिगार प्यायचे. आजारी पडल्यानंतर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे नॉनव्हेज खाणे बंद केले होते. त्यानंतर ते दाळ-भात भाजी आणि २ ते ३ चपात्या खायचे.

बाळासाहेब खाण्याचे शौकीन तर होतेच पण ते एक चांगले कुकसुद्धा होते. अमेरिकेत जेव्हा ते आर्टीस्ट ब्रॅडफोर्डसोबत होते, तेव्हा ते सुप, चीज एग्ज आणि क्रीम क्रॅकर बिस्कीट बनवायचे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.