Ajit Pawar : राज्यात विविध राजकीय पक्षांमध्ये सध्या नेत्यांची ये-जा सुरु आहे. अनेक नेते त्यांचा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. यातच आता श्रीगोंदा येथील एका बड्या नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केल्याची बातमी समोर आली आहे.
राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती प्रविणकुमार उर्फ बाळासाहेब नाहाटा यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात येत आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस आता लक्ष ठेवून आहे.
आमदार बबनराव पाचपुते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये गेले. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी आता राष्ट्रवादीने हा डाव रचला आहे. त्यासाठी बबनराव पाचपुते यांच्याच मतदारसंघातील बाळासाहेब नाहाटा यांना राष्ट्रवादी पक्षात प्रवेश देऊन आपले नेतृत्व मजबूत करणार आहे.
आज श्रीगोंदा येथे राष्ट्रवादीचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी श्रीगोंदा मतदारसंघावर विजय मिळवण्याचा राष्ट्रवादीचा मानस आहे. त्याकरिता आतापासूनच बाळासाहेब नाहाटा यांच्याकडे संभाव्य उमेदवार म्हणून पाहण्यात येत आहे.
बाळासाहेब नाहाटा यांची अजित पवारांनीच राज्य बाजार समिती महासंघ सभापती पदावर नियुक्ती केली होती. एकेकाळी त्यांना बबनराव पाचपुते यांचे कट्टर समर्थक समजले जात होते. पुढे मतभेद झाल्यामुळे त्यांनी पाचपुतेंची साथ सोडली.
राज्यात सध्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडी आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे अडीच वर्षे असलेले महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर या तिन्ही पक्षात सध्या अनेक नेत्यांची ये-जा सुरु आहे. यातच आता नाहाटा यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे श्रीगोंदा मतदारसंघात राष्ट्रवादीला बळ मिळेल.
महत्वाच्या बातम्या
गाडीमधील एअरबॅग उघडून देखील नाही वाचला सायरस मिस्त्री यांचा जीव; काय आहे नेमकं मृत्यूचं कारण, वाचा
‘पैशांसाठी धर्मही विकला’; गणपती बाप्पांची पूजा केल्यामुळे सारा अली खान झाली ट्रोल
काँग्रेसला भलंमोठं भगदाड! अशोक चव्हाणांसोबत १५ आमदार सोडणार पक्ष? दिल्लीतून हलली सूत्र
माळरानावर ड्रॅगनफ्रुटची शेती, वार्षिक २४ लाखांची कमाई, यशोगाथा वाचून वाटेल अभिमान