दारु विक्रेत्यासोबत घडलेल्या ‘त्या’ प्रसंगाने बदलले पुर्ण आयुष्य; आता करतोय चहा विक्रीचा व्यवसाय

कोणतीही व्यक्ती वाईट नसते वाईट असते ती म्हणजे परिस्थिती. याचे उदाहरण अनेकदा बघतो. दारुमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत असतात. दारु पिण्यावर तर दारुचा परीणाम होतच असतो पण दारु विक्री करणाऱ्यावरही याचा परीणाम होतो.

दारुविक्रीमध्ये जास्त पैसे मिळत असल्यामुळे अनेक लोक दारु विक्रीकडे वळतात. पण आता आज आम्ही तुम्हाला अशा एका माणसाबद्दल सांगणार आहोत, ज्या माणसाने चक्क दारु विक्रीचा व्यवसाय सोडून चहाचा व्यवसाय सुरु केला आहे.

दारुचा व्यवसायात प्रचंड पैसा असल्यामुळे हा व्यवसाय लवकर कोणी सोडत नाही. पण नगर जिल्ह्याच्या कर्जतमधल्या बाळासाहेब मानेनं ते करुन दाखवले आहे. कर्जतमध्ये हात भट्टीची दारु विकणाऱ्या बाळासाहेब मानेनं त्याचा दारु व्यवसायाचा धंदा सोडून चहा विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे. तेही पोलिसांच्याच मदतीने.

काही महिन्यांपुर्वी कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी चंद्रशेखर यादव यांची कर्जत भागात बदली झाली होती. तेव्हापासून त्यांनी सर्व अवैध व्यवसायांवर बंदी घातली होती. अवैध दारु व्यवसाय, वाळूच्या गाड्या, पत्तांच्या अड्ड्यांवर त्यांनी छापे मारले आणि सर्वा आरोपींना अटक केली.

दारु व्यवसायात पकडल्या गेलेल्या बाळासाहेबानं आपली सर्व परिस्थिती यादव यांना सांगितली. त्यानंतर चंद्रशेखर यादव यांनी बाळासाहेब मानेला एखादा चांगला व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. इतकेच नाही, तर त्याला व्यवसाय सुरु करण्यास मदतही केली आहे.

कोणतीही व्यक्ती वाईट नसते परिस्थिती त्याला वाईट बनवत असते, पण पुन्हा चांगल्या वाटेवर जाण्याची संधी मिळाली तर व्यक्ती पुन्हा आपल्या चांगल्या मार्गाला लागू शकतो हे बाळासाहेब मानेने दाखवून दिले आहे.

बाळासाहेबने चहाची टपरी टाकून चहाचा व्यवसाय सुरु केल आहे. ज्या पोलिसांनी त्याच्या दारुच्या दुकानावर छापू टाकून त्याच्यावर कारवाई केली होती. आता त्याच पोलिसांनी त्याची मदत करत त्याला व्यवसाय सुरु करुन दिला आहे. या टपरीवर पोलिस चहा पिताना दिसतात.

महत्वाच्या बातम्या-

मनोज बाजपेयीचा अभिनय पाहून वेड्या झाल्या होत्या दोन सिनियर अभिनेत्री; मनोज समोर दिसताच पडल्या होत्या पाया
काय सांगता! चक्क कुत्रा चालवतोय सायकल, तुम्हीही व्हाल अवाक, पहा व्हिडिओ
VIDEO; बस सावकाश चालवण्यास सांगितल्यानं एस. टी. कर्मचाऱ्यांकडून वयोवृद्ध दाम्पत्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.