फक्त ५८,००० मध्ये मिळणारी ‘ही’ बाइक करेल पेट्रोलच्या सर्व चिंता दूर…जाणून घ्या फिचर्स आणि फायदे

देशात सध्या पेट्रोलने शंभरी ओलांडली असून पेट्रोल आणि डिझेलचे आकडे दिवसेंदिवस गगनाला भिडत चालले आहेत. परिणामी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणे अशीच काहीशी अवस्था सर्वसामान्य लोकांची झाली असून सर्वांच्याच खिशाला कात्री बसत आहे.

मात्र पेट्रोल ही अशी गोष्ट आहे की किंमत कितीही वाढली तरी त्याचा वापर करणे आपण थांबवू शकत नाही. कारण रोजच्या जीवनात गाडीने प्रवास करताना पेट्रोल डिझेल भरावेच लागते. पेट्रोलच्या वाढत्या किंमती पाहून बाजारात इलेक्ट्रिक वाहनाची भर पडत असली तरी हवी तेवढी प्रगती सध्याच्या घडीला इलेक्ट्रिक वाहनात झाली नाहीये.

त्यात एकच पर्याय राहतो तो म्हणजे दमदार मायलेज देणारी गाडी विकत घेणे. सध्या बाजारात असलेली बजाज CT 100 हा पर्याय पेट्रोल दर वाढी वर रामबाण उपाय आहे. अवघ्या 58,000 हजार रुपयांत ही बाईक उपलब्ध असून प्रत्येक राज्यातील टॅक्स नुसार किमतीत एक ते दीड हजाराचा फरक पडू शकतो.

केवळ 6 हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्ही ही बाइक घरी घेऊन जाऊ शकता. बजाज कंपनी या गाडीचा 90 kmpl मायलेज असल्याचा दावा करते. फोर स्ट्रोक सिंगल सिलेंडर असलेले हे 100CC चे इंजिन 5,500rpm ला 8.34न्यूटन मीटर ची पॉवर देते.

या बाईकची वैशिष्टे आहेत त्यातील सगळ्यात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे 90kmpl चे मायलेज. तसेच सरकारच्या नव्या धोरणनुसार या बाईकमध्ये BS6 इंजिन असून बाईकला 4 गिअर आहेत. बाईकचे सस्पेन्शन एकदम अव्वल असून लांब पल्ल्याच्या प्रवासात आरामदायी आहेत. बाईकची रचना ही पारिवारिक बाईक ध्यानात ठेऊन केली असल्याने पाठी बसणाऱ्या व्यक्तीस देखील कंफर्ट जाणवेल याची कंपनीने पुरेपूर काळजी घेतली आहे.

एवढे सगळे वैशिष्टे असून 58,000 किंमतीत ही बाइक उपलब्ध असल्याने ही एक चांगली पर्वणीच म्हणावी लागेल. ही बाइक खरेदी करण्यासाठी तुम्हाला EMI चा पर्याय देखील उपलब्ध असून 3 किव्वा 5 वर्षाच्या मुदतीवर कर्ज घेऊन सुद्धा ही बाइक तुम्ही खरेदी करू शकता.

 

महत्वाच्या बातम्या
कंगना राणौतच्या ‘थलायवी’ने आतापर्यंत किती पैसे कमावले आहेत? आकडा ऐकून धक्का बसेल
ठाकरे सरकारच्या डर्टी ११ मध्ये मंत्री हसन मुश्रीफही, १२७ कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
मैत्री असावी तर अशी! इवल्याशा कुत्र्याची घोड्यासोबत जमली गट्टी; व्हिडीओ होतोय भन्नाट व्हायरल
”हा देश आधी इंग्रजांनी आणि नंतर काँग्रेसने लुटला” योगी आदित्यनाथ यांची खरमरीत टीका

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.