होय हे खरं आहे! ‘बाहुबली’तील माहिष्मती काल्पनिक नाहीच, वाचा कुठे आहे हे अनोख राज्य

बाहुबली हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. या दोन्ही भागाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. या चित्रपटाने यशाचे नवे विक्रम नोंदविले आहेत. मात्र या लोकप्रिय चित्रपटाच्या यशावर अनेक चित्रपट समीक्षकांनी प्रश्नचिन्ह उभे केले. काहींचे मत आहे की चित्रपटाची कथा काल्पनिक आहे. ज्यामुळे चित्रपट कमजोर वाटतो.

चित्रपट समीक्षकांच्या टीकेचा चित्रपटाच्या लोकप्रियतेवर कोणताच परिणाम झालेला दिसला नाही. खरं तर या चित्रपटाने हिंदी भाषेतील चित्रपट कथाकारांसाठी एक आव्हान उभे केले आहे. चित्रपटाची कथा काल्पनिक आहे हे खरं असेल पण चित्रपटाची पात्र आणि घटना काल्पनिक आहेत हे खरं नाही.

कथेतील पात्र आणि घटनाक्रम आपल्याला आधीपासूनच ओळखीचा आहे. ज्या राज्यावर चित्रपट बनविला गेला आहे ज्या राज्यासाठी संपूर्ण लढाई लढली गेली आहे ते काल्पनिक नाही. माहिष्मती राज्याबाबत इतिहासात विविध नोंदी दिसून येतात. हे एका काळातील शहर राजकीय आणि सांस्कृतिक केंद्र असल्याचे आढळले आहे.

बाहुबलीत दाखवलेले माहिष्मती साम्राज्य वास्तविक आहे असे म्हटले तर हे सध्या कुठे आहे? हा मोठा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. इतिहासात नोंदवलेल्या नोंदीनुसार बाहुबली चित्रपटाचे केंद्र असलेले माहिष्मती मध्य भारतात स्थित एक मोठे शहर होते.

इतिहासाच्या अनेक नोंदी आणि कथांमध्ये महिष्मतीचा उल्लेख आहे. हे शहर आता मध्य प्रदेश या राज्यात येते. इतिहासातील माहितीनुसार, त्या काळात माहिष्मती अवंती साम्राज्याचा एक महत्वाचा भाग होता.

माहिष्मती चेदी जनपत जिल्ह्याची राजधानी होती. हे शहर नर्मदा नदीच्या काठावर वसलेले होते. माहिष्मतीबद्दल असे सांगितले जाते की सध्या ते मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात आहे. जे आता महेश्वर म्हणून ओळखले जाते.

खरगोन जिल्ह्यातील महेश्वर हे पुरातन मंदिर आणि विविध ऐतिहासिक वास्तू यासाठी प्रसिद्ध आहे. महेश्वर किल्ला, विट्ठलेश्वर मंदिर, अहिलेश्वर मंदिर अशा अनेक ऐतिहासिक वास्तू याठिकाणी आहेत. खरगोनचे महेश्वर हे इंदूरपासून सुमार ९१ किलोमीटर अंतरावर आहे. बाहुबली चित्रपटातील खऱ्या माहिष्मती राज्याला भेट देण्यासाठी याठिकाणी जाता येईल.

महत्वाच्या बातम्या-
ममतांनी केला मोदींचा अपमान; अर्धा तास वाट बघायला लावली अन् पाच मिनीटांत बैठक सोडली
‘इंडियन आयडॉल 12’मधून षण्मुखप्रियाला बाहेर काढण्याची मागणी फेटाळत साउथ इंडस्ट्रीने दिला पाठींबा
भाजप कार्यकर्त्याला केलेली मारहाण पोलिसांना भोवली, जालण्यात PSI सह ५ पोलिसांचे निलंबन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.